शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

फाळेगावात एकाच चितेवर चौघा बापलेकांना भडाग्नी

By admin | Updated: September 9, 2016 02:37 IST

गरिबी आणि कौटुंबिक कलहातून तीन निरागस बालकांना विहिरीत लोटून स्वत:ही त्याच विहिरीत उडी घेऊन एका पित्याने आत्महत्या केली.

रात्री अंत्यसंस्कार : चौघांच्या आत्महत्येने गावकरी शोकाकूलबाभूळगाव : गरिबी आणि कौटुंबिक कलहातून तीन निरागस बालकांना विहिरीत लोटून स्वत:ही त्याच विहिरीत उडी घेऊन एका पित्याने आत्महत्या केली. बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेने फाळेगाववासी हादरून गेले. शवविच्छदनानंतर बुधवारी रात्री ११.४५ वाजता एकाच चितेवर चौघांनीही साश्रूनयनांनी भडाग्नी दिला. त्यावेळी प्रत्येक गावकऱ्याचे डोळे डबडबले.फाळेगाव येथील पांडुरंग कोडापे याने आपल्या तीन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. चौघांचे शवविच्छेदन रात्री बाभूळगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पार पडले. त्यानंतर हे मृतदेह घेऊन बाभूळगाव पोलिसांचा ताफा फाळेगावात पोहोचला. त्यावेळी गावकरी वेशीवर बसून त्यांची वाटच पाहात होते. घटनेच्या दिवशी गावात चुली पेटल्या नाहीत. गायत्री, जय व लहानगी कोमल यांचे मृतदेह पाहून गावातील महिला धाय मोकलून रडत होत्या. शेकडो गावकऱ्यांच्या उपस्थितीत रात्री ११.४५ वाजता चौघांवर अंत्यसंस्कार केले.वडिलांच्या अतिशय रागीट स्वभावामुळे ही तिन्ही मुले कायम दहशतीत असायची, असे गावकऱ्यांनी सांगितले. अंत्यसंस्कार प्रसंगी ठाणेदार हनुमंतराव गायकवाड, सरपंच प्रतिभा पारधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रकरणी पोलिसांनी पांडुरंगची पत्नी व एका इसमाला तात्पुरते ताब्यात घेतले आहे. अधिक तपास केला जात आहे. (प्रतिनिधी) कारण अद्यापही गुलदस्त्यातचौघांच्याही शवविच्छेदनाचा अहवाल आला आहे. गरिबी, नापिकी, कौटुंबिक कलह अशा विविध मुद्यांच्या दिशेने पोलिस तपास करीत आहेत. मृत पांडुरंग कोडापे याने उत्कर्ष फायनान्सकडून कर्ज घेतले होते. या आत्महत्येमागे कर्जबाजारीपणा आहे का, याही दिशेने वेध घेतला जात आहे. डोक्यावर खूप टेंशन असल्याचे पांडुरंग एक आठवड्यापासून वडिलांना सांगत होता. बाभूळगावातील डॉक्टरकडे त्याने प्रकृती दाखविली. मात्र पैसे नसल्याने तो यवतमाळला जाऊ शकला नाही. या प्रकरणात पती-पत्नीच्या भांडणात एका ‘तो’चा उल्लेख करताना गावकरी आढळून आले. मात्र ‘तो’ कोण हे सांगण्यासाठी कुणीही पोलिसांपुढे आले नाही. पण अद्याप कुणीही तक्रार देण्यासाठी पोलिसांपर्यंत आलेला नाही.