शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक कार्यकर्त्यांमुळे शेतात पोहोचली ‘विकासगंगा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 23:41 IST

सामाजिक कार्यकर्त्यांनी जाणीवेने काम केल्यास सर्वसामान्यांच्या जगण्यात परिवर्तन घडण्यास वेळ लागत नाही. घाटंजी येथील सामाजिक संस्थेने हीच जबाबदारी पार पाडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात ‘विकासगंगा’ आणली आहे.

ठळक मुद्देघाटंजी, नेर : धरणातील गाळ वापरून वाढविले उत्पादन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सामाजिक कार्यकर्त्यांनी जाणीवेने काम केल्यास सर्वसामान्यांच्या जगण्यात परिवर्तन घडण्यास वेळ लागत नाही. घाटंजी येथील सामाजिक संस्थेने हीच जबाबदारी पार पाडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात ‘विकासगंगा’ आणली आहे. एकीकडे जलसमृद्धी आणि दुसरीकडे गाळ टाकून शेतीसमृद्धी साधण्यात आली आहे.घाटंजी येथील विकासगंगा संस्थेच्या माध्यमातून ही कामगिरी पार पडली. नेर तालुक्यातील शिंगाडोह प्रकल्पाचा उन्हाळ्यात उपसा करण्यात आला. त्यातील गाळ शेतकºयांना मोफत पुरविण्यात आला. उत्तरवाढोना येथील शेतकरी प्रितम राठोड यांनी या गाळाचा उत्तम वापर केला. या शेतकºयाकडे सहा एकर शेती असून चार एकरमध्ये धरणातील गाळ टाकला. पाऊस लवकर आल्याने दोन एकरमध्ये गाळ टाकणे शक्य झाले नाही. या शेतात सहा एकरमध्ये सोयाबीनचे पीक घेतले. गाळ टाकलेल्या जागेत एकरी साडेसात क्विंटल व गाळ न टाकलेल्या जागेत एकरी साडेचार क्विंटल सोयाबीनचे उत्पादन मिळाले.त्याचवेळी विकासगंगा संस्थेतर्फे घाटंजी तालुक्यातील घोटी लघुप्रकल्पाचाही उपसा करण्यात आला. तेथील गाळ शेतकºयांना देण्यात आला. घोटी येथील शेतकरी जितेंद्र खडतरे यांच्याकडे दोन एकर शेती असून त्यांनी दोन एकरमध्ये धरणातील गाळ टाकला आहे. या शेतात एक एकरमध्ये कापूस व एक एकरमध्ये पाषाणभेद या औषधी वनस्पतीचे पीक घेतले. पिकास कुठल्याही प्रकारचे रासायनिक खत वापरलेले नाही. रसायनमुक्त शेती केली. तसेच फवारणीसाठी निंबोळी व दशपर्णी अर्काचा वापर केला. त्यामुळे शेतीवरील खर्चात बचत झाली असून पीकही जोमदार आहे. गाळ टाकलेल्या जागेत एकरी आठ ते दहा क्विंटल कापूस उत्पादनाचा अंदाज आहे. गाळामुळे भुसभुशीत झालेल्या जागेत पाषाणभेद या कंदवर्गीय औषधी वनस्पतीची उत्तम वाढ झाल्याने एकरी सात क्विंटल वाळलेल्या मुळांचे उत्पादन मिळणार आहे. पाषाणभेद लावलेल्या शेतात गाळ टाकलेल्या व गाळ न टाकलेल्या जागेवरील पिकाच्या वाढीमध्ये फरक दिसून येत आहे.

टॅग्स :agricultureशेती