शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
4
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
5
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
6
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
7
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
8
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
9
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
10
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
11
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
12
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
13
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
14
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
15
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
16
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
17
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
18
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
19
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
20
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 

प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीच्या अध्यक्षपदी विजय दर्डा यांची फेरनिवड

By admin | Updated: June 11, 2016 02:44 IST

येथील प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीच्या अध्यक्षपदी लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांची शुक्रवारी एकमताने निवड करण्यात आली.

संचालक मंडळाची बैठक : उपाध्यक्षपदी कीर्ती गांधी, मुख्यमंत्र्यांपुढे मांडणार समस्या यवतमाळ : येथील प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीच्या अध्यक्षपदी लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांची शुक्रवारी एकमताने निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी माजी आमदार कीर्ती गांधी यांची निवड झाली. प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच अविरोध झाली. यानंतर शुक्रवारी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी सूतगिरणीत संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अध्यक्षपदासाठी खासदार विजय दर्डा यांचे नाव कीर्ती गांधी यांनी सुचविले. त्याला माणिकराव भोयर यांनी अनुमोदन दिले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी खासदार दर्डा यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा केली. तर उपाध्यक्षपदासाठी माजी आमदार कीर्ती गांधी यांचे नाव जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि सूतगिरणीचे संचालक बाळासाहेब मांगुळकर यांनी सुचविले. त्याला उज्ज्वला अटल यांनी अनुमोदन दिले, त्यांची निवडही अविरोध झाली. निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष खासदार विजय दर्डा यांनी सर्व संचालकांना मार्गदर्शन केले. सूतगिरणीच्या खडतर वाटचालीची माहिती विषद केली. ते म्हणाले, शासन नवीन सूतगिरण्यांना सात टक्के व्याजअनुदान आणि भागभांडवलामध्ये १० टक्के मदत करते. हा निकष जुन्या सूतगिरण्यांसाठी मात्र नाही. त्यामुळे जुन्या सूतगिरण्यांना स्पर्धेत टिकणे शक्य होत नाही. त्यातून तोटा वाढत आहे. या अनुषंगाने आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत १० आॅगस्ट २०१५ रोजी बैठक घेतली होती. या बैठकीत शासकीय व्याजअनुदान, भागभांडवल, प्रकल्पाचे फेरमुल्यांकन करण्याची मागणी केली. मात्र त्यानंतरही या प्रस्तावाचा शासनातर्फे विचार झाला नाही. सूतगिरणीच्या अडचणी वाढतच आहेत. आता याच मुद्यावर पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार असल्याचे विजय दर्डा यांनी सांगितले. या सभेला संचालक किशोर दर्डा, अनिल पालतेवार, डॉ. जाफरअली अकबरअली जीवाणी, संतोषकुमार भूत, प्रकाशचंद छाजेड, संजय पांडे, कैलास सुलभेवार, जयानंद खडसे, डॉ. प्रताप तारक, लीलाबाई बोथरा उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दारव्हाचे सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) प्रेम राठोड यांनी काम पाहिले. त्यांना उमरखेडचे सहाय्यक निबंधक सुनील भालेराव आणि सुमित ठमके यांनी सहकार्य केले. आभार संचालक माणिकराव भोयर यांनी मानले. (कार्यालय प्रतिनिधी)