शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

विजय दर्डा : ‘मेडिकल’ अभ्यागत मंडळाची बैठक

By admin | Updated: August 9, 2014 01:21 IST

रुग्णांवर नातेवाईक समजून उपचार करा

यवतमाळ : वैद्यकीय महाविद्यालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला मोठी अपेक्षा असते. मात्र दिवसेंदिवस आरोग्य यंत्रणेत संवेदनशीलता कमी होत असल्याचे दिसते. वशिला असलेल्यांवरच लवकर उपचार होतात, अशी धारणा झाली आहे. रुग्णांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी डॉक्टरांनी प्रत्येक रुग्णाला आपला नातेवाईक समजून उपचार करावे, असे भावनिक आवाहन लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन तथा वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष खासदार विजय दर्डा यांनी उपस्थित डॉक्टरांना दिले.वैद्यकीय महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित अभ्यागत मंडळाच्या बैठकीला पालकमंत्री शिवाजीराव मोघे, आमदार वामनराव कासावार, आमदार ख्वॉजा बेग, आमदार हरिभाऊ राठोड, माजी आमदार संदीप धुर्वे, जिल्हाधिकारी राहुलरंजन महिवाल, अधीष्ठाता डॉ.आनंद डोंगरे, आरोग्य उपसंचालक अविनाश लव्हाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्यासह अभ्यागत मंडळाचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीत अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष खासदार विजय दर्डा यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील विविध समस्या आणि रुग्णसेवेबाबतचा आढावा घेऊन उपस्थित डॉक्टरांना निर्देश दिले. खासदार दर्डा म्हणाले, रक्त देण्याच्या पारंपरीक पद्धतीत बदल झाला आहे. नव्या पद्धतीने रुग्णाला संक्रमण होत नाही. याबाबत विभाग प्रमुखांनी माहिती घ्यावी. रिक्त पदांच्या संदर्भात मुंबई येथे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक लावून समस्या निकाली काढणार असल्याचे सांगितले. याची सविस्तर टिपणी देण्याचे निर्देश अधिष्ठातांना दिले. महाविद्यालयात बीएससी नर्सिंग अभ्यासक्रम नसल्याची त्रुटी आहे. सध्या अस्तित्वात असलेले नर्सिंग विद्यालय जिल्हा शल्य चिकित्सकाच्या अधिपत्याखाली आहे. आरोग्य सेवा विभागाने आरोग्य शिक्षण विभागाकडे विद्यालय हस्तांतरित करावे. यासाठी राज्य शासन स्तरावर पालकमंत्र्याची मदत घ्यावी, असे सांगितले.