शहरं
Join us  
Trending Stories
1
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
2
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
3
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
4
सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
5
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
7
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
8
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
9
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
10
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
11
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
12
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
13
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
14
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
15
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
16
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
17
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!
18
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
19
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
20
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त

दिग्रसमध्ये हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन

By admin | Updated: June 26, 2017 00:52 IST

तालुका पत्रकार संघटना व पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इफ्तार पार्टी, विद्यार्थ्यांचा गौरव आणि .....

इफ्तार पार्टी : पत्रकार संघटना, पोलीस ठाण्याचा पुढाकार, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव लोकमत न्यूज नेटवर्क दिग्रस : तालुका पत्रकार संघटना व पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इफ्तार पार्टी, विद्यार्थ्यांचा गौरव आणि शांतता समितीच्या सभेत हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन घडले. सर्वधर्मीय नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून शहराच्या लौकिकात भर टाकली. अध्यक्षस्थानी तहसीलदार किशोर बागडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून काजी मौलाना अबुल जफर, सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष रामू पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.नीलेश पांडे, नगरपरिषद मुख्याधिकारी शेषराव टाले, पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या सफाई कामगार आयोग अध्यक्षपदी नियुक्त झाल्याबद्दल रामू पवार, संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (यूपीएससी) यश संपादन करणारे परीक्षित झाडे व प्रज्ञा खंडारे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच दहावी-बारावीतील ९५ टक्केपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या ५३ विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.संचालन मजहर अहमद खान यांनी, प्रास्ताविक पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे यांनी तर आभार सहायक पोलीस निरीक्षक गजानन खार्डे यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य हितेश राठोड, लखन राठोड, नगरपरिषद शिक्षण सभापती सैयद अक्रम, बांधकाम सभापती बाळू जाधव, नगरसेवक केतन रत्नपारखी, भाजपा जिल्हा सरचिटणीस महादेव सुपारे, प्रमोद बनगिनवार, माजी नगराध्यक्ष रवींद्र अरगडे, पंचायत समिती सदस्य अरविंद गादेवार, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस राजा चव्हाण, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष लालसिंग राठोड, सुधीर देशमुख, पूनम पटेल, जावेद पटेल, अरबाज धारिवाला, अ‍ॅड.देशपांडे, शिवसेना तालुका प्रमुख राजकुमार वानखडे, मुख्याध्यापक गोरटे, संजय कुकडी, सुरेश चिरडे, प्रकाश सातघरे, अभय इंगळे, रामदास पद्मावार, संजय शुक्ला, लक्ष्मण टेकाळे, विलास निकम, प्रफुल्ल व्यवहारे, अशोक जाधव, गोपाल शहा, मेमन जमातीचे अध्यक्ष हाजी हारून इसाणी, हाजी शौकत मलनस, गटशिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी, जामा मशिद ट्रस्टचे अध्यक्ष मिर्झा अफजल बेग, शिवतेज संघटनेचे अध्यक्ष संतोष झाडे, डॉ.दत्तात्रय ढोले, इद्रीस डोसाणी, हाजी करीम नागपुरे, फैयाज मलनस, स्वप्नील दुधे, नंदराज गुर्जर, संजय खंडारे, पुंडलिकराव इंगळे, शरद गोविंदवार, उद्धव अंबुरे आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी दिग्रस तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष किशोर कांबळे, सचिव यशवंत सुर्वे, प्रवीण ठाकूर, संदीप रत्नपारखी, अमीन चव्हाण, हनुमान रामावत, धर्मराज गायकवाड, अजीस शेख, कपिल इंगोले, नसीम बेग, श्यामकुमार लोखंडे, शरद गोविंदवार, अक्षय बरतेरे, प्रशांत झोळ, अ. रफिक, मुनीर खान, रामेश्वर जाजडा, उद्धव अंबुरे, आनंद आडे, वसंत चव्हाण, गौतम तुपसुंदरे, अजीम खान, विष्णुपंत यादव, राजू कदम, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नाईक, बाबाराव पवार, गणेश मोरे, अ.रफीक, अनंता उघडे, पुंडलिक वानखड़े, नारायण पवार आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाला सर्व धर्मीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.