शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
2
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
3
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड
4
Stock Market Today: ७९ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; रियल्टी आणि ऑटो सेक्टरमध्ये तेजी, कारण काय?
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
रेल्वे तिकीट बुकिंग, पॅन, ITR सह अनेक नियमांमध्ये बदल; एटीएमच्या वापरावरही शुल्क, जाणून घ्या काय काय बदललं
7
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
8
तू काय माझ्याकडे डोळे वटारून बघतो?; राज ठाकरेंनी विचारलं, स्टेजवर बोलावलं, सगळेच हसले!
9
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
10
काँग्रेसचे १५० नेते रशियाचे एजेंट, परदेशातून मिळायची फंडिंग; भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा
11
'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, रणबीरची ऑनस्क्रीन लक्ष्मणासोबत गळाभेट; Video व्हायरल
12
Vijay Pendse Dies: इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन
13
सव्वा लाखाची चप्पल? अहो, ही तर आमची कोल्हापुरी!
14
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
15
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
16
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
17
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
18
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
19
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
20
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे

विद्यार्थिनीच्या खुनातील आरोपीने विष घेतले

By admin | Updated: September 22, 2015 03:38 IST

एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीचा दत्तात्रयनगर परिसरात खून करून पसार झालेल्या संशयित आरोपी ओमप्रकाशने

यवतमाळ : एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीचा दत्तात्रयनगर परिसरात खून करून पसार झालेल्या संशयित आरोपी ओमप्रकाशने आपल्या मूळ गावी गोन्हा येथे विष प्राशन केल्याची घटना उघडकीस आली आहे. खुनाच्या घटनेपासून पोलीस संशयित आरोपीच्या मागावर होते. मात्र त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. लोहारा येथील विद्यार्थिनी सोनाली हिचा येथील दत्तात्रयनगर परिसरात चाकूने भोसकून शुक्रवारी निर्घृण खून झाला होता. वडगाव पोलिसांनी या प्रकरणी आरोपीचा शोध सुरू केला असता नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील गोन्हा येथील ओमप्रकाश गुजवार याचे नाव पुढे आले होते. त्याचा शोध पोलीस घेत होते. पोलिसांचे दोन पथकही तयार करण्यात आले होते. नागपूर जिल्ह्यासह लगतच्या मध्यप्रदेशातील सीमावर्ती भागातही ओमप्रकाशचा शोध सुरू होता. मोबाईल लोकेशनवरुन त्याचा शोध घेणे सुरु असताना सोमवारी त्याने विष प्राशन केल्याची माहिती वडगाव रोड पोलिसांच्या शोध पथकाला मिळाली. पसार असलेला संशयित आरोपी पोलिसांच्या टप्प्यात आला. मात्र त्याने विष प्राशन केल्याने त्याला नागपूर येथील रुग्णालयात दाखल केल्याचे पोलीस सूत्राकडून सांगण्यात आले. त्याच्या प्रकृतीबाबत कुठलीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. शोध पथकातील अधिकारी व कर्मचारी काटोल रुग्णालयात पोहोचले असून डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतरच संशयित ओमप्रकाशला ताब्यात घेण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. तूर्तास वडगाव रोड पोलीस ओमप्रकाशच्या प्रकृत्तीवर लक्ष ठेऊन आहे.