शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
4
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
5
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
6
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
7
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
8
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
9
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
10
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
11
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
12
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
13
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
14
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
15
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
16
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
17
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
18
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
19
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
20
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?

आरोग्यच्या बदली यादीत सेवानवृत्तही!

By admin | Updated: May 14, 2014 02:09 IST

जिल्हा परिषद आरोग्य विभागाने बदली पात्र कर्मचाऱ्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये प्रचंड अनागोंदी दिसून येते. सेवानवृत्त झालेल्या काही कर्मचाऱ्यांनाही प्रशासकीय

यवतमाळ : जिल्हा परिषद आरोग्य विभागाने बदली पात्र कर्मचार्‍यांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये प्रचंड अनागोंदी दिसून येते. सेवानवृत्त झालेल्या काही कर्मचार्‍यांनाही प्रशासकीय बदलीसाठी पात्र असल्याचे त्यामध्ये दाखविण्यात आले आहे. केवळ बदलीची यादी प्रसिद्ध करण्याच्या नादात अनेक चुका यामध्ये ठेवण्यात आल्या आहे.

आरोग्य विभागाने पंचायत समिती स्तरावरून आलेल्या याद्या जशाच्या तशाच जिल्हा कार्यालयात प्रसिद्ध केल्या आहे. या याद्यांमध्ये कुठलाही फेरबदल अथवा क्रमाने तयार करण्यात आलेल्या नाही. त्यामुळे सेवाज्येष्ठतांच्या यादींमध्ये अनेक उलटफेर आढळून येतात. १५ ते १६ वर्ष सेवा दिलेल्यांची नावे ज्येष्ठतांमध्ये सर्वात शेवटी आहे. तर चार ते पाच वर्षांची सेवा झालेल्यांची नावे वरच्या क्रमांकावर दिसून येतात. हा प्रकार कर्मचार्‍यांना गोंधळात टाकणारा आहे. अशा यादीवर आक्षेपच कशा पद्धतीने घ्यायचा असा पेच कर्मचार्‍यांकडून निर्माण झाला आहे. आदिवासी व नक्षलग्रस्त भागाकरिता पाच वर्ष ही कालर्मयादा ठरविली आहे.

यादीमध्ये तीन वर्ष गैरआदिवासी व गैर नक्षलग्रस्त भागात काम केलेल्यांची नावे प्रशासकीय यादीत आहेत, अशा प्रकारे बदली प्रक्रिया झाल्यास कर्मचार्‍यांना रिक्त होणार्‍या जागांचा अंदाजच येणार नाही. त्यामुळे ही प्रक्रियाच सुधारित पद्धतीने घेतली जावी, अशी मागणी कर्मचार्‍यांकडून केली जात आहे.

यापूर्वी २0१३ मध्ये करण्यात आलेल्या बदली प्रक्रियेबाबत नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेने आयुक्तांकडे तक्रार केली होती.

याची दखल घेऊन या प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी वाशिम जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. ८ मे रोजी या संपूर्ण प्रक्रियेचा तपास करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात येऊन गेले आहे. आता नव्याने होणारी प्रक्रियासुद्धा अनेक त्रुट्या ठेऊन केली जात आहे. ही प्रक्रिया थांबविण्यात यावी, अशी मागणीही कर्मचार्‍यांकडून केली जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)