शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

शस्त्रक्रियेच्या रुग्णांवर चक्क जमिनीवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:16 AM

कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना चक्क जमिनीवर झोपून उपचार घ्यावे लागल्याचा खळबळजनक प्रकार पारवा प्राथमिक आरोग्य केंद्रात पुढे आला आहे.

ठळक मुद्देपारवा प्राथमिक आरोग्य केंद्र : नवजात बालकांसह मातांची गैरसोय

अब्दुल मतीन ।लोकमत न्यूज नेटवर्कपारवा : कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना चक्क जमिनीवर झोपून उपचार घ्यावे लागल्याचा खळबळजनक प्रकार पारवा प्राथमिक आरोग्य केंद्रात पुढे आला आहे. नवजात बालकांसह या महिलांच्या आरोग्याची तर दूर सुरक्षेची दक्षता घ्यायलाही याठिकाणी कुणीही जबाबदार व्यक्ती नव्हता. शुक्रवारी घडलेल्या या प्रकाराने नागरिकांमध्ये प्रचंड राग व्यक्त होत आहे.घाटंजी तालुक्यात असलेल्या पारवा प्राथमिक आरोग्य केंद्राला तब्बल ३५ ते ४० गावे जोडण्यात आली आहे. सुविधांच्या बाबतीत या ‘पीएचसी’ची नेहमीच बोंबाबोंब राहिली आहे. वैद्यकीय अधिकारी यांच्यासह इतर कर्मचारीही रुग्णांना चांगली सेवा देण्याचे सौजन्य दाखवित नाही. आता तर कळस गाठला आहे. शस्त्रक्रिया झालेल्या महिला रुग्णांना दोन पुरुष कर्मचारयांच्या भरवशावर सोडून देण्यापर्यंत मजल गेली आहे.या प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ १६ बेड आहेत. गुरुवारी २५ महिलांवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आली. यातील १६ महिलांना बेड मिळाले. उर्वरित नऊ महिलांना जमिनीवर झोपावे लागले. त्यांच्यासोबत नवजात बालकेही होती. शुक्रवारी तर सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास त्यांची सुश्रुषा करण्यासाठीही अधिकारी आणि कर्मचारी नव्हते. चौकीदार आणि एका शिपायावर ही जबाबदारी सोडून अधिकारी व कर्मचारी निघून गेले. याविषयी घाटंजी तालुका आरोग्य अधिकारी विजय उमरे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी आपली प्रकृती ठीक नसल्याने रुग्णालयात दाखल असल्याचे सांगितले. स्थानिक अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहून सेवा द्यायला पाहिजे, असे ते म्हणाले.दररोज २०० रुग्णांची तपासणीपारवा प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज १५० ते २०० रुग्णांची तपासणी केली जाते. सोमवारी बाजाराच्या दिवशी ४०० ते ५०० रुग्ण उपचारासाठी येतात. वैद्यकीय अधिकारी त्यांच्या सोयीने पोहोचतात. अत्यवस्थ रुग्णांवर उपचारासाठी तर ते उपयोगीच पडत नाही. त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे या रुग्णालयाचे सफाई कामगार सकाळी १० वाजता पोहोचतात. आरोग्य केंद्र ८ वाजता उघडले जाते. १० वाजेपर्यंत स्वच्छताच होत नाही. या आरोग्य केंद्राला स्वत:ची रुग्णवाहिका नाही. या सर्व प्रकाराकडे वरिष्ठ आरोग्य अधिकारी, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष सुरू आहे.वैद्यकीय अधिकारी कमालीचे उदासीनपारवा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन पदे मंजूर आहेत. पैकी एक जागा भरली आहे. डॉ. संजय पुराम यांच्याकडे या पदाची जबाबदारी आहे. ते घाटंजीहून काम सांभाळतात. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी याठिकाणी सुसज्ज अशी निवासस्थाने बांधली आहे. त्याचा उपयोग अधिकारी आणि कर्मचारी घेत नाहीत. आरोग्य सेवेविषयी त्यांची कमालीची उदासीनता आहे.थंडीत कुडकुडत काढली रात्रकुटुंब कल्याण शस्त्रक्रियेच्या रुग्णाला तीन दिवस रुग्णालयात दाखल ठेवले जाते. थंडीचे दिवस असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राने त्यांच्यासाठी आवश्यक त्या वस्तू उपलब्ध करून देणे गरजेचे होते. मात्र प्रसूत आणि शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना तीन दिवस कुडकुडत जमिनीवर रात्र काढावी लागली. शिवाय नवजात बालकांचेही प्रचंड हाल झाले. सोबत असलेल्या नातेवाईकांची तर झोप उडाली होती. या आरोग्य केंद्राचा संपूर्ण परिसर झुडपांनी व्यापला आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांचा संचार याठिकाणी आहे. सुरक्षेच्यादृष्टीनेही आरोग्य प्रशासनाने उपाययोजना केल्या नाहीत.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल