शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सुसाट धावणारी वाहने कॅमेरात झाली कैद, पावणेदोन कोटीचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 05:00 IST

महानगरामध्ये प्रमुख चौकात वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्ही कॅमेरातून नजर ठेवली जाते. ही प्रणाली यवतमाळ शहरात अद्याप पोहोचलेली नाही. यवतमाळातील काही प्रमुख चौकात ट्राफीक सिग्नल कार्यरत होते. आता विकास कामाच्या नावाने हे वाहतूक सिग्नलही गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत. चौकात वाहतूक पोलीस उभे राहूनही गोंधळलेल्या वाहतुकीला दिशा दाखविण्याचे काम करत नाहीत.

ठळक मुद्देनिर्धारित गतीचा नियम मोडला : महानगरासारखी प्रणाली यवतमाळ शहरात नाही

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ नागपूर-हैद्राबाद तर राष्ट्रीय महामार्ग नागपूर-तुळजापूर हा जातो. या दोन्ही महामार्गावर वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस चौक्या आहेत. त्या ठिकाणी वाहनांवर कारवाईकरिता इंटरसेप्टर वाहनातून कॅमेराद्वारे नजर ठेवली जाते. त्यात सुसाट वेगाने धावणार्या वाहनांना थेट ऑनलाईन चलान देवून दंड आकारला जातो. करंजी महामार्ग पोलिसांनी वर्षभरात १२ हजार ९०८ वाहनांकडून एक कोटी २९ लाख आठ हजारांचा दंड वसूल केली. तर धनोडा महामार्ग पोलिसांनी सात हजार ७९७ वाहनांवर कारवाई करत ४९ लाख ५९ हजारांचा दंड वसूल केला. राज्यात पहिल्या दहामध्ये कारवाई करण्याचा बहुमान करंजी महामार्ग पोलिसांनी मिळवला आहे. हेल्मेट नसलेल्या पाच हजार ७७६ दुचाकीस्वारांवर कारवाई केली आहे. या कारवाईतून २८ लाख ३८ हजारांचा दंड वसूल केला आहे. इंटरसेप्टर वाहनातील कॅमेराद्वारे होणाऱ्या कारवाईमुळे कुणीही वाहनधारक सुटू शकत नाही. त्याला नियम मोडल्यास दंड निश्चत आहे. 

यवतमाळातील चौकात सीसीटीव्हीतून वाहतूक नियंत्रण नाहीमहानगरामध्ये प्रमुख चौकात वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्ही कॅमेरातून नजर ठेवली जाते. ही प्रणाली यवतमाळ शहरात अद्याप पोहोचलेली नाही. यवतमाळातील काही प्रमुख चौकात ट्राफीक सिग्नल कार्यरत होते. आता विकास कामाच्या नावाने हे वाहतूक सिग्नलही गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत. चौकात वाहतूक पोलीस उभे राहूनही गोंधळलेल्या वाहतुकीला दिशा दाखविण्याचे काम करत नाहीत. उलट हे वाहतूक शिपाई रस्त्याच्या कडेला उभे राहून केवळ कारवाई करण्यातच धन्यता मानतात. 

नियम मोडणाऱ्यांवर इंटरसेप्टर वाहनाची नजरमहामार्गावर वाहन चालविताना वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर इंटरसेप्टर वाहनातील कॅमेराच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे. आपण नियम मोडला, हे त्या वाहनचालकांना थेट दंडाची चलान मिळाल्यानंतरच माहीत होते. त्यांना ऑनलाईनच दंड भरावा लागतो. 

ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक कारवाईकोरोना महामारीत अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर महामार्गांवर वाहनांची वर्दळ वाढली. ऑक्टोबर महिन्यात धनोडा येथील आणि करंजी येथील महामार्ग पोलीस चौकीअंतर्गत सर्वाधिक कारवाया करण्यात आल्या. सुमारे चार हजार वाहनांना दंड ठोठावण्यात आला. 

राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. या महामार्गावर वाहनांची गतीही तासी ९० किलोमीटर तर घाटात तासी ५० किलोमीटर इतकी निर्धारित करून दिली आहे. विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांनाही कारवाई केली जात आहे. यातून शिस्त राखण्याचा प्रयत्न आहे. - संदीप मुपडे, सहायक पोलीस निरीक्षक, हायवे पोलीस

 

टॅग्स :cctvसीसीटीव्हीTrafficवाहतूक कोंडी