शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वणीत वाहतूक विभागाकडून कारवाईचा धडाका

By admin | Updated: June 9, 2017 01:48 IST

गेल्या काही महिन्यापासून विस्कळीत झालेल्या वणी शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून

वाहतुकीला शिस्त लावणार : बाजारपेठेतील मार्ग केले मोकळे, रस्त्यांनी घेतला मोकळा श्वासलोकमत न्यूज नेटवर्कवणी : गेल्या काही महिन्यापासून विस्कळीत झालेल्या वणी शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून येथील वाहतूक शाखेने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. येथे नव्यानेच रुजू झालेले वाहतूक निरीक्षक संग्राम ताटे यांच्या नेतृत्वात ही कारवाई सुरू आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून वणी शहरातील वाहतूक व्यवस्था पार विस्कळीत झाली होती. बेशिस्त वाहतुकीमुळे सामान्यांना मनस्ताप सहन करावा लागत होता. मिळेल त्या वर्दळीच्या ठिकाणी वाहने उभी केली जात होती. त्यामुळे वाहतुकीची वारंवार कोंडी होत असे. मुख्य बाजारपेठेत व्यापाऱ्यांकडून रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले होते. दुकानातील साहित्य वाहतुकीच्या रस्त्यावर ठेवण्यात येत आहेत. अगोदरच बाजारपेठेतील रस्ते चिंचोळे असल्याने नागरिकांना या रस्त्याने जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासोबतच वाहतुकीच्या अनेक समस्या शहरात आहे. त्याचे निराकरण करण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे वाहतूक पोलीस निरीक्षक संग्राम ताटे यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. गेल्या दोन दिवसांपासून वणी शहरात बेशिस्त वाहतुकीविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार भरधाव वेगाने दुचाकी चालविणाऱ्या दोघांविरुद्ध कलम २७९ अन्वये कारवाई करण्यात आली. २० अवैैध वाहतुकदाराविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. दोन धूम स्टाईल बायकर्सविरुद्धही कारवाई करण्यात आली. रुजू होताच, स्वत: वाहतूक पोलीस निरीक्षक संग्राम ताटे यांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला. शहरातील गांधी चौैकातील गांधी पुतळ्यासमोर रस्त्याच्या मधोमध वाहने उभी केली जात होती. ऐन गर्दीच्यावेळी या ठिकाणी दुचाकींची गर्दी होत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. ही बाब लक्षात घेऊन त्या ठिकाणी वाहतूक पोलीस शिपायाची नियुक्ती करून तेथे वाहन उभे करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत तेथे वाहने उभी करणे बंद झाले आहे. स्वत: ताटे यांनी व्यापारपेठेत जाऊन रस्त्यावर दुकानातील साहित्य ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांना समज देऊन यापुढे रस्त्यावर साहित्य न ठेवण्याबद्दल बजावले. पूर्वी वाहतूक पोलीस शिपाई आडोशाला उभे राहून वाहनधारकांविरुद्ध कारवाई करीत होते. मात्र यापुढे नेमून दिलेल्या ठिकाणीच उभे राहून वाहतूक शिपाई कारवाई करणार असल्याचे ताटे यांनी सांगितले. वॉटर कॅन वितरकांना वेळेचे बंधनशहरात मोठ्या प्रमाणावर कॅनमधील पाण्याचा पिण्यासाठी वापर करण्यात येतो. या कॅन वाहनाद्वारे पोहचविल्या जातात. व्यापारपेठेतील दुकानदारांकडेदेखील या कॅन पोहचविल्या जातात. हे कॅन वितरक बाजारपेठेत कोणत्याही वेळी रस्त्यावर वाहने उभी करून कॅनचे वितरण करीत होते. मात्र आता त्यांना सकाळी ११ वाजताच्या अगोदरच बाजारपेठेत कॅनचे वितरण करावे लागणार आहे. वाहतूक शाखेने सर्व कॅन वितरकांना नोटीस देऊन वेळेचे पालन करण्याबाबत बजावले आहे.