शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्याआड दारूची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 23:23 IST

बंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात भाजीपाल्याआड दारूची तस्करी केली जात असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी यवतमाळात केलेल्या कारवाईत उघड झाले.

ठळक मुद्देयवतमाळात कारवाई : कारंजावरून चंद्रपूरकडे जाणारी वाहने जप्त

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : बंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात भाजीपाल्याआड दारूची तस्करी केली जात असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी यवतमाळात केलेल्या कारवाईत उघड झाले. बोलेरो पिकअप आणि स्कोडा कारमध्ये फुलकोबीआड देशी-विदेशी दारूचे बक्से आढळून आले. पोलिसांनी तीन लाखांच्या दारूसह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई येथील नेताजी चौक परिसरात करण्यात आली.कारंजा येथून यवतमाळमार्गे चंद्रपूरकडे देशी-विदेशी दारू जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसंना मिळाली. त्यावूरन येथील नेताजी चौक परिसरात सापळा रचला. कारंजाकडून आलेली बोलेरो पिकअप (क्र.एम.एच.३७-जे-११९४) व त्या पाठोपाठ काळ्या रंगाची स्कोडा फाबिया (क्र.एम.एच-३१-सीआर-४३९०) या दोन्ही गाड्या थांबवून तपासणी केली. त्यावेळी बोलेरो पिकअपमध्ये मागच्या बाजूला फुलकोबी आणि आतील बाजूला ८० बॉक्स देशी दारू, एका बॉक्समध्ये १०० प्रमाणे आठ हजार गण बॉटल, दुसºया २० बॉक्समध्ये १०० गण क्षमतेच्या दोन हजार बॉटल्स असा ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर स्कोडा वाहनाच्या डिक्कीमध्ये सात बॉक्स विदेशी दारू किंमत ४९ हजार, दुसºया बॉक्समध्ये १८० एमएल क्षमतेच्या ४८ बॉटल्स किंमत सात हजार ६८० जप्त करण्यात आल्या. दोन्ही वाहनातील दारूची किंमत तीन लाख १६ हजार रुपये आणि दोन्ही वाहनांची किंमत आठ लाख रुपये आहे.या प्रकरणी नसीम खान सलीम खान (२२) रा. दहीपुरी कारंजा, अहमद खान युसुफ खान (२८) रा. प्रभात टॉकीजजवळ कारंजा, रवींद्र वासुदेव राठोड (३२) रा. शिक्षक कॉलनी कारंजा, नासीर बेग सफदर बेग (३५), वाईनशॉप मालक रमेश उर्फ मुन्ना रा. कारंजा यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, सहायक पोलीस निरीक्षक सुरज बेंडे, सारंग मिराशी, पोलीस शिपाई विशाल भगत, संदीप मेहेत्रे, हरीष राऊत यांनी केली.