शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वेडशीत जीवनाधाराला आबालवृद्धांची साथ

By admin | Updated: April 27, 2017 00:27 IST

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने वेडशी गावातील आबालवृद्ध ‘जीवना’धारासाठी झटत आहेत.

पहाटेपासूनच गुंततात अनेक हात : राळेगाव तालुक्यातील ४० गावात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा अशोक पिंपरे  राळेगाव सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने वेडशी गावातील आबालवृद्ध ‘जीवना’धारासाठी झटत आहेत. गाव आणि परिसरातील पाण्याची पातळी वाढावी, टिकून राहावी यासाठी त्यांची ही धडपड सुरू आहे. या कामी श्रमदानात शेकडो हात गुंतले आहेत. राळेगाव तालुक्यातील ४० गावांमध्ये २२ मेपर्यंत सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा राबविली जात आहे. यात वेडशी गावाचाही समावेश आहे. या स्पर्धेत सहभागी होणे किती महत्त्वाचे आहे, ही बाब सरपंच अंकुश मुनेश्वर यांनी ग्रामसभेतून गावकऱ्यांना पटवून दिली. श्रमदानातून पाणी अडवा पाणी जिरवा उपक्रम राबविण्याचे आवाहन त्यांनी केले. या आवाहनाला हो देत गावातील पुरुष, स्त्रिया, विद्यार्थी, विद्यार्थिनी दररोज सकाळी ७ वाजताच गावातील टेकडीवर जातात. पाणी फाऊंडेशनच्या नियमानुसार श्रमदानातून विविध कामे पूर्णत्वास गेली आहेत. गावातील आणि परिसरातील पाण्याची पातळी वाढली पाहिजे, हा ध्यास गावकऱ्यांनी घेतला आहे. सरपंच अंकुश मुनेश्वर, विठोबा काटकर, दादाराव चौधरी, तुळशीदास कुडमेथे, मोहन मोहुर्ले, प्रमोद चिव्हाणे, हनुमान उताणे, उपसरपंच नीळकंठ चौधरी, वसंत सोनुर्ले, चंद्रमणी पाटील, विशाल कोटरंगे, विनायक नखाते, कुणाल नखाते, प्रज्ज्वल डंभारे, वेदांत चौधरी, प्रज्ज्वल चंदनखेडे, विनय देहारे, बबन बोरकर, नितीन उताणे, गौरव निम्रड, धर्मपाल पाटील, पंजाबराव मोहुर्ले आदींकडून श्रमदान केले जात आहे. घरातील कामे पटापट आटोपते घेत महिलाही या चळवळीत सहभागी झाल्या आहे. कधीही अंगमेहनतीची कामे न केलेल्या महिलांच्या हातात पावडे, डोक्यावर टोपले हे चित्र आज वेडशीत पाहायला मिळत आहे. मनीषा चव्हाण, अन्नपूर्णा नखाते, वैशाली चौधरी आदी महिला श्रमदान करत आहेत.