शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वसुधा प्रतिष्ठानचा पुरस्कार वितरण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 22:17 IST

वसुधा प्रतिष्ठानच्यावतीने येथील जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात प्रसिद्ध कवी, सिने पार्श्वगायक, संगीतकार प्रा. प्रशांत मोरे यांचा ‘आई : एक महाकाव्य’ हा आईवरील कवितांचा विशेष कार्यक्रम पार पडला.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वसुधा प्रतिष्ठानच्यावतीने येथील जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात प्रसिद्ध कवी, सिने पार्श्वगायक, संगीतकार प्रा. प्रशांत मोरे यांचा ‘आई : एक महाकाव्य’ हा आईवरील कवितांचा विशेष कार्यक्रम पार पडला. सर्व भारतीय भाषेतील आईचे महात्म्य सांगणाऱ्या कवींच्या कवितांची सुंदर गुंफन करून मोरे यांनी भारतातील ५६०० कार्यक्रमानंतर यवतमाळ नगरीत हा कार्यक्रम सादर केला.कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री मदन येरावार, प्रमुख पाहुणे प्रा.डॉ. अशोक मेनकुदळे होते. प्रा.डॉ. रमाकांत कोलते यांनी अध्यक्षस्थान भूषविले.प्रा. प्रशांत मोरे यांनी सुरेश भट यांच्या ‘आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा, शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा’ या कवितेपासून कार्यक्रमाला प्रारंभ केला. महाराष्ट्रातील अप्रतिम कवितांची काव्यमाला आईस अर्पण करताना त्यांनी काव्यांना सुंदर चाली लावल्या. स.ग. पाचपोळ यांची मूळ कविता ‘हंबरूनी वासराले चाटते जेव्हा गाय, तिच्या मंदी दिसते मला तव्हा माही माय’ या काव्याने श्रोत्यांच्या काळजाचा ठाव घेण्यात मोरे यशस्वी झाले. कवियित्री बहिणाबार्इंच्या आईवरील काव्य, अशोक बुरबुरे यांचे काव्य, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बोली भाषेतील काव्यातून त्यांनी आईला काव्यांजली समर्पित केली.यावेळी आपल्या कर्तृत्वाने आदर्शाचा उच्चांक गाठणाऱ्या महानुभावांचा गौरव करण्यात आला. वसंतराव शेटे स्मृती वीरशैव लिंगायत विदर्भरत्न पुरस्कार विडूळचे प्रा.डॉ. सचितानंद शंकर बिचेवार यांना देण्यात आला. सुधाताई वसंतराव शेटे स्मृती अक्का महादेवी माय माऊली पुरस्काराने विजया प्रदीपराव महाजन यांना गौरविण्यात आले. वसंतराव शेटे स्मृती वीरशैव लिंगायत समाज भूषण पुरस्कार शिवानंद मारोतराव घाटोळकर यांना प्रदान करण्यात आला.यावेळी पालकमंत्री मदन येरावार, डॉ. अशोक मेनकुदळे, प्रा. प्रशांत मोरे, डॉ. सचितानंद बिचेवार, शिवानंद घाटोळकर आदींनी मनोगत व्यक्त केले. तुतारीच्या, शंखाच्या मंगलध्वनीच्या वातावरणात हे पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन जयंत शेटे यांनी केले. आभार वसुधा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष नीलेश शेटे यांनी मानले.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ