शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

‘वसंत’ची वाटचाल अधोगतीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 01:01 IST

‘कामधेनू’ अशी सार्थ बिरूदावली असलेला वसंत सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देशेतकºयांची कामधेनू : भाडेतत्त्वाच्या निर्णयाने उलटसुलट चर्चा

अविनाश खंदारे ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : ‘कामधेनू’ अशी सार्थ बिरूदावली असलेला वसंत सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला. विदर्भातील एकमेव सहकारी तत्त्वावर सुरू असलेला हा कारखाना आता लवकरच खासगी व्यवस्थापनाच्या ताब्यात जाईल आणि तेथून कधी विक्री होईल, हेही शेतकºयांना कळणार नाही. काँग्रेसकडून कारखाना भाजपाने ताब्यात घेऊन या कारखान्याला आगीतून फुफाट्यातच टाकले आहे.शेतकºयांच्या घामातून आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या दूरदृष्टीतून उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथे साखर कारखाना उभा राहिला. १९६९ सालापासून या कारखन्याच्या चिमणीतून अविरत धूर निघत आहे. सहकार क्षेत्रातील दिग्गजांनी या कारखान्यासाठी आपल्या रक्ताचे पाणी केले. विदर्भ आणि मराठवाड्यातील पाच तालुक्यातील शेतकºयांसाठी हा कारखाना ‘लाईफलाईन’ ठरला. शेकडो कामगार, अधिकारी यांना प्रत्यक्ष तर हजारो हातांना या कारखान्यामुळे काम मिळाले. प्रगतीचे शिखरे गाठत या भागातील शेतकºयांनी आपली उन्नती साधली. साखर कारखाना म्हणजे या भागासाठी कामधेनू ठरला.परंतु सहकारातील राजकारण येथेही आडवे आले. कारखाना हळूहळू आर्थिक डबघाईस जावू लागला. परंतु कारखाना वाचला तरच शेतकरी जगेल, या भूमिकेतून कारखान्याची चाके फिरती ठेवली. परंतु गत दोन वर्षांपासून कारखाना अधिकच आर्थिक टंचाईच्या गर्तेत सापडला. गत वर्षी तर केवळ २५ हजार टन एवढे निच्चांकी गाळप करण्याची नामुष्की कारखान्यावर आली. त्यातच ३० महिन्यांपासून कामगारांचे वेतन नाही. कारखाना सुरू कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला. त्यातूनच सत्ताधारी भाजपाच्या ताब्यात कारखाना देण्याच्या हालचाली सुरू झाल्या. काँग्रेसचे माजी आमदार माधवराव जवळगावकर यांना अध्यक्षपदावरून हटवून भाजपाचे अ‍ॅड.माधवराव माने अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यामुळे शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या. भाजपा सरकार कारखाना सुरू करण्यासाठी पैसे देईल, अशी आशा होती. पंरतु सुमारे १०० कोटी कर्ज असलेल्या कारखान्याच्या थकहमीसाठी शासनाने हात वर केले. कर्ज हवे असेल तर संचालक मंडळाने आपल्या मालमत्तेचे गहाणखत करून द्यावे, असा प्रस्ताव पुढे ठेवला. परंतु कारखान्याच्या हिताच्या गोष्टी करणाºया संचालक मंडळातील कुणालाही हा प्रस्ताव पचनी पडला नाही. अखेर पुसदच्या विश्रामगृहावर बुधवारी संचालक मंडळाची सभा झाली. कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय झाला.विदर्भातील सहकारी तत्त्वावर सुरू असलेला ‘वसंत’ हा एकमेव सहकारी साखर कारखाना आहे. परंतु आता हा मानही लवकरच हिरावला जाणार आहे. कारखाना कुण्यातरी बड्या कारखानदाराला भाडेतत्त्वावर दिला जाईल. त्यानंतर हळूच जिल्ह्यातील इतर साखर कारखान्याची झालेल्या अवस्थेसारखी त्याचीही अवस्था होईल. कुणी तरी साखर सम्राट हा कारखाना विकत घेईल आणि शेतकºयांची कामधेनू साखर सम्राटाच्या दावणीला बांधली जाईल. साखर कारखाना जगवायचा असेल तर सर्व राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे. कारखाना एकदा भाडेतत्त्वावर गेला की शेतकºयांचे कुणी ऐकणार नाही. कामगारांना कुणी उभे करणार नाही. पुष्पवंती अर्थात सुधाकर नाईक साखर कारखान्याच्या कामगारांचे जसे सध्या हाल सुरू आहे, त्याच वाटेवर येथील कामगारही जातील.