शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

‘वायपीएस’मध्ये विविध कार्यक्रम

By admin | Updated: February 5, 2017 00:54 IST

यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले. अमरचंद दर्डा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

 यवतमाळ : यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले. अमरचंद दर्डा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमप्रसंगी मंचावर प्राचार्य शंकरराव सांगळे, अमरचंद दर्डा, प्रभारी प्राचार्य अर्चना कढव, समन्वयक रुक्साना बॉम्बेवाला, कार्यालय प्रमुख विवेक भोयर, पर्यवेक्षिका निशा जोशी, सीसीए प्रमुख अमोल चन्नूरवार आदी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. सर्वप्रथम चेतक, गजराज, पुष्पक आणि विक्रांत या सदनातील आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांनी पथसंचलन केले. संगीत शिक्षिका विद्या वावरकर आणि विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीत सादर केले. विशाल शेंदरकर यांच्या मार्गदर्शनातही देशभक्तीपर गीत सादर करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत प्रीती लाखकर यांच्या मार्गदर्शनात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. आशंता बुटले यांच्या मार्गदर्शनातही देशभक्तीगीतावर नृत्य सादर करण्यात आले. मार्च ड्रील व पिरॅमीड, बलून ड्रील, स्टंट शो, पिरॅमीड व योग यासह विविध कलांचे सादरीकरण करण्यात आले. यासाठी विद्यार्थ्यांना राधिका जयस्वाल, प्रवीण कळसकर, सुदर्शन महिंद्रे, आशंता बुटले, अमोल चन्नूरवार यांचे मार्गदर्शन लाभले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवित शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. यावेळी शंकरराव सांगळे, अमरचंद दर्डा आदींनी समयोचित मार्गदर्शन केले. संचालन योगिता कडू, श्रृती जोशी यांनी, तर आभार निशा जोशी यांनी मानले. कार्यक्रमासाठी अभिजित भिष्म यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)