शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा स्मृतिदिनानिमित्त आज विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 05:00 IST

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे रोहयो मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे, जगविख्यात ऑस्टिओपॅथी तज्ज्ञ डाॅ. गोवर्धन लाल पाराशर (जोधपूर, राजस्थान), ‘लोकमत’ मीडिया प्रा. लि. चे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, माजी शिक्षण व उद्योगमंत्री तथा ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, ‘लोकमत’चे माजी संपादक ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या २४ व्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवारी बाबूजींचे समाधीस्थळ असलेल्या ‘प्रेरणास्थळा’वर आदरांजली, त्यानंतर  मातोश्री दर्डा सभागृहाच्या हिरवळीवरून जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलच्या इमारतीचे लोकार्पण होणार असून तीनदिवसीय मोफत ऑस्टिओपॅथी शिबिराचेही उद्घाटन होईल.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे रोहयो मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे, जगविख्यात ऑस्टिओपॅथी तज्ज्ञ डाॅ. गोवर्धन लाल पाराशर (जोधपूर, राजस्थान), ‘लोकमत’ मीडिया प्रा. लि. चे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, माजी शिक्षण व उद्योगमंत्री तथा ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, ‘लोकमत’चे माजी संपादक ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. २५ नोव्हेंबर रोजी गुरुवारी सकाळी ९ ते १० या वेळेत प्रेरणास्थळावर आदरांजली कार्यक्रम होईल. यावेळी स्थानिक गायक कलावंत बाबुजींना  गायनातून श्रद्धांजली अर्पण करतील. २५ नोव्हेंबर रोजीच सकाळी १० ते ११.१५ या वेळेत  मातोश्री दर्डा सभागृहाच्या हिरवळीवरून जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलच्या इमारतीचे राज्यपालांच्या हस्ते लोकार्पण होईल. याचवेळी तीनदिवसीय मोफत ऑस्टिओपॅथी उपचार शिबिराचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन होईल. बाबुजी यांचा स्मृती समारोह यवतमाळच्या आरोग्य, शिक्षण व कलेच्या क्षेत्राला नवी दिशा देणारा ठरणार आहे. 

स्मृतिदिनानिमित्त आज होणारे कार्यक्रम

२५ नोव्हेंबर, गुरुवार : आदरांजली वेळ : सकाळी ९ ते १० स्थळ : प्रेरणास्थळसादरकर्ते : स्थानिक कलावंत 

२५ नोव्हेंबर, गुरुवार : जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम  स्कूल इमारतीचे उद्‌घाटन वेळ : सकाळी १० ते ११.१५स्थळ : मातोश्री दर्डा सभागृह

२५ नोव्हेंबर, गुरुवार : डाॅ.गोवर्धन लाल पाराशर (जोधपूर) यांच्या तीन दिवसीय ऑस्टिओपॅथी कॅम्पचे उद्‌घाटन वेळ : सकाळी १० ते ११.१५ स्थळ : मातोश्री दर्डा सभागृह 

 

टॅग्स :Jawaharlal Dardaजवाहरलाल दर्डा