शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांसाठी काँग्रेसचा तहसीलवर मोर्चा

By admin | Updated: January 3, 2016 02:56 IST

शेतकरी व शेतजुरांच्या ज्वलंत समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी येथील टिळक चौकातून काँग्रेसतर्फे तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

एसडीओंना दिले निवेदन : वणी तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर व कार्यकर्त्यांनी घेतला होता सहभागवणी : शेतकरी व शेतजुरांच्या ज्वलंत समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी येथील टिळक चौकातून काँग्रेसतर्फे तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.हा मोर्चा टिळक चौकातून दुपारी १ वाजता निघाला. शासनाच्या विरोधात घोषणा देत शेतकरी, शेतमूजर व कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा टिळक चौक, खाती चौक, जटाशंकर चौक, गांधी चौक, टागौर चौक, आंबेडकर चौकातून फिरून तहसील कार्यालयावर धडकला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी चंद्रपूरचे माजी खासदार नरेश पुगलीया व वामनराव कासावार यांनी महागाई व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी देण्यात यावी, आणेवारी ५० टक्केपेक्षा कमी करून दुष्काळ जाहीर करावा, पीक आणेवारीची पद्धत बदलविण्यात यावी, वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, भारनियमन बंद करून शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा करावा, शेतकऱ्यांना त्वरित वीज जोडणी द्यावी, शेतमालाला महागाई निर्देशांकाप्रमाणे भाव द्यावा, सोयाबीनला पाच तर कापसाला प्रती क्विंटल सात हजार रूपये भाव द्यावा, नवरगाव, बेंबळा धरणाचे पाणी कालव्याद्वारे शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवावे, कालवा दुरूस्त करावा, नवीन सभासदांना जिल्हा बँकेने पीक कर्जाचे वाटप करण्यात यावे.तसेच वनजमीन कसणाऱ्यांना पट्टे द्यावे, मिरची पिकांवरील रोगाची नुकसान भरपाई द्यावी, पीक विमा मंजूर करून त्वरित वाटप करावे, कापसाला प्रति क्विंटल दोन हजार रूपये बोनस द्यावा, रोजगार हमीची कामे सुरू करावी, शेतकरी व शेतमजुरांना पेंशन लागू करावी, वणी शहराला नवीन वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करावी व शहरातील शासकीय जागेवरील झोपडपट्टींना पट्टे द्यावे, आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्व चंद्रपूरचे माजी खासदार नरेश पुगलीया, माजी आमदार वामनराव कासावार, वसंत जिनिंगचे अध्यक्ष अ‍ॅड.देवीदास काळे यांनी केले होते. मोर्चात काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत गोहोकार, राजाभाऊ पाथ्रडकर, राकेश खुराणा, मोरेश्वर पावडे, प्रा.टिकाराम कोंगरे, पुरूषोत्तम आवारी, प्रमोद वासेकर, सुनील कातकडे, शरद ठाकरे, संजय खाडे, प्रसाद ठाकरे, गोपाल भदोरीया, भास्कर गोरे, बाबाराव चौधरीसह तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, काँग्रेसचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते सहभागी झाले होते. (कार्यालय प्रतिनिधी)