शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांच्या दहशतीत वणीत तेंदूपत्ता संकलन

By admin | Updated: May 17, 2017 00:57 IST

वणीसह झरी, मारेगाव तालुक्यातील जंगलांमध्ये तेंदूपत्ता संकलनाला सुरूवात झाली आहे.

हल्ले सुरूच : टीचभर पोटासाठी जीव टांगणीला लोकमत न्यूज नेटवर्क वणी : वणीसह झरी, मारेगाव तालुक्यातील जंगलांमध्ये तेंदूपत्ता संकलनाला सुरूवात झाली आहे. मात्र वन्यप्राण्यांच्या दहशतीत मजुरांंना तेंदूपत्त्याचे संकलन करावे लागत आहे. कोणतीही सुरक्षा नसतानाही पोटाची खळगी भरण्यासाठी भल्या पहाटेच शेकडो मजूर तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात रवाना होत आहेत. गेल्या पाच वर्षांत वणी उपविभागातील जंगलात वन्यप्राण्यांची संख्या वेगाने वाढत आहे. पूर्वी या जंगलात रोही, हरिण, ससे, रानडुकर, मोर, सायाळ आदी वन्यजीव होते. मात्र अलिकडील पाच वर्षांत या जंगलामध्ये पट्टेदार वाघांची संख्या वाढत आहे. अस्वल, बिबट्याचेही दर्शन नागरिकांना होत आहे. यातून वन्यप्राणी आणि मानव संघर्ष वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी पांढरकवडा क्षेत्रात येणाऱ्या दुभाटी पोड येथील हुसेन टेकाम नामक ४५ वर्षीय शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केला. शेतीची कामे संपल्याने तो रोजगार मिळावा म्हणून तेंदूपत्ता संकलनासाठी गेला होता. मात्र घराकडे परत येताना त्याच्यावर अस्वलाने हल्ला करून त्याला जखमी केले. मागील महिन्यात झरी तालुक्यातील एका तेंदूपत्ता मजुरावर पट्टेदार वाघाने हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला. याच तालुक्यातील पवनारलगतच्या एफडीसीएमच्या जंगलात तीन वाघांचा वावर आहे. आजवर या जंगलात बिबट्याचा वावर नव्हता. मात्र तीन दिवसांपूवी एक बिबट वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला. या जंगलात रानडुकरांची संख्याही मोठी आहे. वणी उपविभागातील जंगलात तेंदूपत्ता मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा दर्जाही उत्तम आहे. त्यामुळे बाजारपेठेत येथील तेंदूपत्त्याला मागणीही आहे. उन्हाळ्यात शेतमजुरांच्या हाताला काम नसल्याने तेंदू हंगाम या मजुरांसाठी पर्वणी असतो. तेंदूपत्ता संकलनातून मिळणाऱ्या पैशात पुढील काही महिन्याची जगण्याची तजवीत ते करीत असतात. त्यातून आर्थिक विवंचनाही दूर होते. त्यामुळे शेकडो मजूर दररोज तेंदूपत्ता संकलनाच्या कामात राबत आहेत. तेंदूपत्ता तोडाईसाठी जंगलात जाणाऱ्यांमध्ये लहान मुलांसह घरातील मंडळीचाही सहभाग असतो. भल्या पहाटे जंगलात निघून जायचे आणि सायंकाळी घरी परत यायचे, असा या शेतमजुरांचा दिनक्रम सुरू आहे. यातून आर्थिक मिळकत होत असली तरी वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची भीती कायम मनात ठेऊन त्यांना तेंदूपत्ता संकलन करावे लागत असल्याचे चित्र आहे. संरक्षणासाठी नवी शक्कल वन्यप्राण्यांची संख्या झरी तालुक्यात अधिक आहे. दाभाडी, शिबला, मार्थाजून, वरपोड या जंगलात वन्यप्राण्यांसह वाघांचाही वावर आहे. दोन महिन्यांपूर्वी वरपोडच्या जंगलात एकाचवेळी दोन पट्टेदार वाघांनी दर्शन दिले होते. सध्या उन्हाची तिव्रता अधिक वाढल्याने जंगलातील पाणवठे आटले आहेत. त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी लोकवस्त्यांकडे येत आहेत. त्यामुळे अनेक गावांमध्ये रात्रभर ध्वनीक्षेपकावर गाणी अथवा भजने वाजविली जात आहे. या आवाजामुळे वन्यजीव गावाकडे येत नसल्याचा गावकऱ्यांचा अनुभव आहे.