शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वणीत ६४ लाखांचा बंधारा रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 21:34 IST

पावसाळ्यात अधिकाअधिक पाणी अडविता यावे, यासाठी वणी शहरातून वाहणाऱ्या निर्गुडा नदीवरील वामनघाट परिसरात ६४ लाख रुपये खर्चाचा बंधारा बांधण्याचे काम पालिकेने मागील वर्षी सुरू केले खरे; परंतु वर्ष लोटूनही हा बंधारा अर्धवट अवस्थेत उभा आहे. पालिका प्रशासनाकडून वाळू टंचाईचे कारण पुढे केले जात असले तरी काम थांबण्यामागे वेगळेच कारण असल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देनिर्गुडा नदी : काम अर्धवट, नदी काठावर मलबा पडून, पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : पावसाळ्यात अधिकाअधिक पाणी अडविता यावे, यासाठी वणी शहरातून वाहणाऱ्या निर्गुडा नदीवरील वामनघाट परिसरात ६४ लाख रुपये खर्चाचा बंधारा बांधण्याचे काम पालिकेने मागील वर्षी सुरू केले खरे; परंतु वर्ष लोटूनही हा बंधारा अर्धवट अवस्थेत उभा आहे. पालिका प्रशासनाकडून वाळू टंचाईचे कारण पुढे केले जात असले तरी काम थांबण्यामागे वेगळेच कारण असल्याची चर्चा आहे.एका राजकीय नेत्याच्या पुत्राला या बंधाºयाचे काम देण्यात आले होते. निविदेनुसार या बंधाऱ्यासाठी दुय्यम दर्जाचे लोखंडी गज वापरण्यात आले. परंतु हे कंत्राट सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या पुत्राला देण्यात आल्याने या प्रकाराकडे पालिका प्रशासनाने जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले. मागील वर्षी निर्माण झालेल्या पाणी टंचाईमुळे पालिकेने या बंधाºयाचे काम त्वरित सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. मात्र कंत्राटदाराच्या कासवगतीने अद्यापही हा बंधारा पूर्णत्वास येऊ शकला नाही. काम सुरू झाले तेव्हा मुबलक प्रमाणात रेती उपलब्ध होती. त्याचवेळी कंत्राटदाराने रेतीची साठवणूक का केली नाही, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.आतापर्यंत नगरपालिकेने संबंधित कंत्राटदाराला २८ लाख रुपये अदा केले. मात्र आतापर्यंत झालेल्या कामावर खरेच २८ लाख रुपये खर्च झाले का, हादेखील संशोधनाचा विषय आहे. सध्या वणी शहराला नव्या नळयोजनेद्वारे वर्धा नदीवरून पाणी पुरवठा सुरू आहे. परंतु भविष्यात या नळयोजनेत काही बिघाड झाला, तर पर्यायी व्यवस्था म्हणून निर्गुडा नदीत पाण्याचा साठा अतिशय आवश्यक आहे. दुष्काळी स्थितीमुळे यंदाही वणीकरांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.मारेगाव तालुक्यातील नवरगाव धरणातून ठराविक वेळी निर्गुडा नदीत पाणी सोडले जाते. परंतु सक्षम बंधाºयाअभावी हे पाणी पुढे वाहून जाते. त्यामुळे अर्धवट बांधण्यात आलेला हा बंधारा कुचकामी ठरत आहे. बंधाºयाच्या ठिकाणी मलबा तसाच पडून तो उचलण्याचे सौजन्यदेखील संबंधित कंत्राटदाराने दाखविले नाही.