नेर : नेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी वनिता मिसळे यांची गुरुवारी अविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर विजयी जल्लोष करण्यात आला.नेर नगरपरिषदेवर शिवसेनेची सत्ता असून नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव होते. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ वनिता मिसळे यांच्या गळ्यात पडणार हे निश्चित झाले होते. गुरुवारी निवडणूक निर्णय अधिकारी चेतन गिरासे व मुख्याधिकारी धीरज गोहोड यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्यावेळी नगराध्यक्ष पदासाठी केवळ वनिता दीपक मिसळे यांचे नामांकन आले. त्यामुळे त्यांची निवड अविरोध करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी पवन जयस्वाल यांची निवड करण्यात आली. यावेळी नगरसेवक संजय दारव्हटकर, माया राणे, संध्या चिरडे, विनोद जयसिंगपुरे, शालिक गुल्हाने, इब्राहिम नूर, भाऊराव ढवळे, रुपाली दहेलकर, वैष्णवी गुल्हाने, रश्मी पेटकर, उज्वला मेंढे, शकीला बानो, नासीर खान उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
नेरच्या नगराध्यक्षपदी वनिता मिसळे
By admin | Updated: June 17, 2016 02:47 IST