लोकमत न्यूज नेटवर्कवणी : येत्या ३१ मार्च रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सोमवारी अखेरच्या दिवसापर्यंत ३१६ जागांसाठी ८३५ नामांकन दाखल झाले. यात सर्वाधिक ५६ नामांकन हे वणी शहरालगतच्या लालगुडा ग्रामपंचायतीसाठी प्राप्त झाले आहेत.वणी तालुक्यातील ४० ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत्या ३१ मार्चला पार पडणार आहे. त्यासाठी नामांकन दाखल करण्याची सोमवारी अखेरची तारीख होती. त्यामुळे येथील तहसील कार्यालयात उमेदवारांची प्रचंड गर्दी झाली होती. वणी तालुक्यात पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी पिंपरी (कायर) येथून २४ नामांकन, सावर्ला १५, उमरी १८, कुंभारखणी १६, मुर्धोणी ९, नवरगाव १३, भालर ३३, शिरपूर २९, मारेगाव (कोरंबी) २७, मानकी ९, पेटूर ७, वागदरा २८, लालगुडा ५६, नायगाव (खु.) १८, पुनवट २४, निलजई २२, बेलोरा २२, तरोडा २८, परसोडा १५, मोहोर्ली २०, पिंपळगाव ११, बेसा १८, कवडशी १६, सावंगी १५, विरकुंड १६, नायगाव (बु.) २५, चिंचोली १०, शेवाळा ९, वडजापूर १८, घोन्सा ३०, महांकालपूर १४, रासा २९, दहेगाव ३४, सुकनेगाव २६, सोनेगाव २४, निवली २४, लाठी २३, पुरड १५, शेलु (बु.) १४, तर उकणी येथून ३५ नामांकन प्राप्त झाले आहे.सुरूवातीला नामांकन अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख १२ मार्च होती. परंतु नामांकन दाखल करण्याच्या अगदी अगोदरच्या दिवशी निवडणूक आयोगाने नामांकन दाखल करताना जात पडताळणी प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य केल्याने उमेदवारांची चांगलीच पंचाईत झाली. यामुळे अनेक जागा रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने ११ मार्चला ही अट शिथिल केली. मात्र एका दिवसात नामांकनाची प्रक्रिया पूर्ण करणे शक्य नसल्यामुळे नामांकन दाखल करण्यासाठी पुन्हा चार दिवस वाढवून देण्यात आले होते. एकीकडे कोरोनाची दहशत असताना दुसरीकडे ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेतल्या जात आहेत. कोरोनाचा धसका बाजुला ठेवत उमेदवारांनी निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. गावागावात विजयासाठी व्यूव्हरचना आखल्या जात आहे.झरी तालुक्यात एकूण २५५ नामांकनझरी तालुक्यातील १४ ग्रामपंचायतीच्या ९८ जागांसाठी निवडणूक घेतली जात आहे. त्यात सुर्ला येथून ४०, दाभाडी १५, मांगुर्ला १४, सिंधीवाढोणा १५, चिचघाट १२, बोपापुर १६, पिवरडोल १४, गवारा १५, वेडद १५, हिरापूर १७, पिंपरड २३, अर्धवन ११, खातेरा २०, तर पांढरकवडा लहान येथून २८ नामांकन अर्ज दाखल झाले आहे.
वणी तालुक्यात ३१६ जागांसाठी ८३५ नामांकन अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:00 IST
वणी तालुक्यातील ४० ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत्या ३१ मार्चला पार पडणार आहे. त्यासाठी नामांकन दाखल करण्याची सोमवारी अखेरची तारीख होती. त्यामुळे येथील तहसील कार्यालयात उमेदवारांची प्रचंड गर्दी झाली होती.
वणी तालुक्यात ३१६ जागांसाठी ८३५ नामांकन अर्ज दाखल
ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : लालगुडातून सर्वाधिक ५६ अर्ज