लोकमत न्यूज नेटवर्क वणी : जनावरांना घेऊन कत्तलीसाठी तेलंगणाकडे निघालेला भरधाव ट्रक वणी शहरालगतच्या घोन्सा चौफुलीवर उलटला. शनिवारी पहाटे घडलेल्या या दुर्घटनेत चार जनावरे ठार झाली. अपघातानंतर ट्रकचालक व त्याचे सहकारी घटनास्थळावरून फरार झाले. अपघातानंतर ट्रकमधील काही जनावरे लगतच्या ड्रीम लॅन्ड सीटी परिसरात शिरली. काहींनी या जनावरांना बांधून ठेवले. त्यानंतर पोलिसांनी शोध मोहिम राबवून ही जनावरे ताब्यात घेतली. अपघातग्रस्त ट्रक पोलिसांच्या भितीने भरधाव जात होता. मात्र घोन्सा मार्गावरील वळणावर हा ट्रक उलटला. सदर ट्रक कुठून आला, याचा उलगडा मात्र झाला नाही. वाचलेल्या जनावरांना गोरक्षणात ठेवण्यात आले आहे.
वणीत जनावरांचा ट्रक उलटला
By admin | Updated: July 9, 2017 00:53 IST