शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

वणीत कॉंग्रेसचा जनआक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 23:21 IST

सध्या सुरू असलेल्या शेतकºयांना विषबाधा होण्याच्या घटना, शेतमाल विकताना शेतकºयांची होणारी लूट याची जाणिव शासनाला करून देण्यासाठी वणी, मारेगाव व झरी तालुका कॉंग्रेस ....

ठळक मुद्देशासनाला निवेदन : सरसकट कर्जमाफीसह विविध मागण्या

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : सध्या सुरू असलेल्या शेतकºयांना विषबाधा होण्याच्या घटना, शेतमाल विकताना शेतकºयांची होणारी लूट याची जाणिव शासनाला करून देण्यासाठी वणी, मारेगाव व झरी तालुका कॉंग्रेस कमिटीच्यावतीने मंगळवारी वणीत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तीनही तालुक्यातील शेकडो पदाधिकारी,कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.स्थानिक वसंत जिनिंगमधून या मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार वामनराव कासावार, माजी जि.प.सभापती नरेंद्र ठाकरे, अ‍ॅड.देविदास काळे, जि.प.सभापती अरुणा खंडाळकर, मोरगावच्या पं.स.सभापती शितल पोटे, झरीचे भिमारेड्डी बाजन्लावार, राजू येल्टीवार यांनी केले.मोर्चा उपविभागीय कार्यालयावर पोहचल्यानंतर उपविभागीय अधिकाºयांना निवेदन देण्यात आले. शेतकºयांना विनाअट सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, विषबाधेत मृत्यू पावलेल्या शेतकºयांच्या कुटुंबियाला दहा लाखांची मदत देण्यात यावी, कापसाला सात हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यात यावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची सरकारने अंमलबजावणी करावी, वणी परिसरातील लोडशेडींग त्वरित बंद करावे, यासह अनेक मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.मोर्चाच्या यशस्वीतेसाठी वणी तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष विवेक मांडवकर, शहर अध्यक्ष राजाभाऊ पाथ्रडकर, पुरूषोत्तम आवारी, राकेश खुराणा, प्रमोद वासेकर, शालिनी रासेकर, वंदना धगडी, भास्कर गोरे, सुरेश बन्सोड, जि.प.सदस्य अनिल देरकर, राजीव कासावार, संदीप बुर्रेवार यांच्यासह तिनही तालुक्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.