शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१८ वर्षांपुढील लसीकरण रविवारपासून होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 05:00 IST

यवतमाळ जिल्ह्यात १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी २०० केंद्रे सुरू करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले. मात्र, ही केंद्रे सुरू करण्यासाठी लागणारा लसींचा साठा मिळाला, तरच सुरू होणार आहे. सध्याच्या घडीला जिल्ह्यात येणारा लसींचा साठा मागणीच्या तुलनेत अपुरा आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी लागणारी लस जिल्ह्याला अद्यापही मिळाली नाही. शनिवारी ही लस दुपारनंतर पोहोचण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देलसींचा साठा पोहोचलाच नाही : पाच केंद्रांवर दिली जाणार लस

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिनापासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे. मात्र, जिल्ह्याला १८ वर्षांपुढील नागरिकांसाठी लागणारी लस जिल्ह्यात पोहोचली नाही. यामुळे हे लसीकरण एक दिवस पुढे ढकलण्यात आले आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यांत पाच केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यात १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी २०० केंद्रे सुरू करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले. मात्र, ही केंद्रे सुरू करण्यासाठी लागणारा लसींचा साठा मिळाला, तरच सुरू होणार आहे. सध्याच्या घडीला जिल्ह्यात येणारा लसींचा साठा मागणीच्या तुलनेत अपुरा आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी लागणारी लस जिल्ह्याला अद्यापही मिळाली नाही. शनिवारी ही लस दुपारनंतर पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे या वयोगटातील लसीकरण करण्यासाठी एक दिवस पुढे ढकलण्यात आले आहे. लसीकरणासाठी पाच केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये यवतमाळातील दोन अर्बन पीएचसी, पांढरकवडा, पुसद आणि दारव्हा या केंद्रांवर कोरोनाची लस पहिल्या टप्प्यात दिली जाणार आहे. त्यासाठी ऑनलाईन ॲपवर नोंदणी केलेल्या नागरिकांनाच ही लस मिळणार आहे. यामुळे ऑनलाईन नोंदणी न करता केंद्रावर पोहोचणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागणार आहे. यामुळे आधी लसीकरणाचे कन्फर्मेशन झाल्यानंतरच लसीकरण केंद्रावर पोहोचावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.१८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यांचा एकूण आकडा पाहिल्यानंतर कुठल्या केंद्रावर किती लस पाठवायची याचे नियोजन होणार आहे. ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांना जवळच्या केंद्रांवर अथवा तालुक्याच्या ठिकाणी लसीकरणासाठी संपर्क करावा लागणार आहे. प्रत्येक केंद्रावर पाच व्यक्तींची टीम नियुक्त करण्यात आली आहे.लसीकरणाचे स्वतंत्र केंद्रसध्या सुरू असलेले लसीकरण केंद्र वगळता इतर ठिकाणी १८ ते ४४ वर्ष वयोगटातील लसीकरणाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. यामुळे या सध्या सुरू असलेल्या केंद्रांवर कुठलाही अतिरिक्त भार पडणार नाही. या शिवाय कुठलाही गोंधळ उडाला तरी परिस्थिती हाताळणे सोईचे होणार आहे. तूर्त १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. उपलब्धतेनुसार लसीकरण केंद्र टप्प्याटप्प्याने वाढविले जाणार आहे. 

जिल्ह्याला १ मेपासून लसीकरण करता येणार नाही. ते एक दिवस पुढे ढकलण्यात आले आहे. उपलब्धतेनुसार लसीकरण केंद्र उघडले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच केंद्र सुरू करण्यात येणार आहे. - श्रीकृष्णनाथ पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस