शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
2
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
3
"संतोष देशमुखांच्या हत्येला मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार"; मनोज जरांगे पाटील यांचा आरोप
4
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
5
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक
6
रेपो दरात कपात, ५० आणि २० लाखांच्या लोनवर किती कमी होणार EMI? जाणून घ्या
7
परिस्थिती गंभीर! कोरोनापेक्षाही जीवघेणा 'हा' आजार; हृदयावरच आघात, दरवर्षी १८ मिलियन मृत्यू
8
९५ वर्षांचे आजोबा, ७० वर्ष राहत होते लिव्हइनमध्ये, आता झाली लग्न करायची इच्छा अन्...  
9
'स्पिरीट'नंतर दीपिका पादुकोण 'या' बिग बजेट सिनेमातूनही बाहेर? अभिनेत्रीच्या अटींमुळे मेकर्स विचारात
10
खळबळजनक! WhatsApp वर देवाचा फोटो DP; हनीट्रॅप, हेरगिरीसाठी पाकिस्तानचं 'देसी' प्लॅनिंग
11
Vijay Mallya : "हवं तर फरार म्हणा पण चोर म्हणू नका..," विजय माल्ल्यानं 'यांची'ही मागितली माफी
12
"लग्न झालं की लाइफ सेट असंच वाटायचं, पण...", लग्नाबद्दल स्पष्टच बोलली मधुराणी, म्हणाली...
13
Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक
14
देशातील निष्पाप नागरिकांवर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना पोसत होते, काश्मीरमधील 'त्या' ४ जणांना होणार शिक्षा!
15
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
16
महाराष्ट्राची 'समृद्धी': देशातील सर्वांत रुंद बोगद्यातून इगतपुरी-कसारा अंतर ८ मिनिटांत
17
NIrjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कोणते पदार्थ खाऊ नये, याची आजच नोंद करून घ्या!
18
भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती
19
राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी रात्री जेवून झोपल्या, सकाळी उठल्याच नाहीत; सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यू

सहकारातही मोदींच्या नावाचा वापर

By admin | Updated: June 25, 2016 02:32 IST

सहकारातील निवडणुकीत अपवादानेच घडलेला प्रकार राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दिसत आहे.

राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती प्रचार युद्ध : काँग्रेसचेही व्हीआयपी नेते फलकावरके.एस. वर्मा राळेगावसहकारातील निवडणुकीत अपवादानेच घडलेला प्रकार राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील नेत्यांचे चेहरे प्रचार फलकावर झळकू लागले आहे. एकूणच या निवडणुकीने पक्षीय स्वरूप घेतले आहे. त्यातल्या त्यात काँग्रेसमध्येच दोन गट आमनेसामने आले. दोघेही आम्हीच खरे काँग्रेसचे असा दावा करत आहे. आमदार प्रा.डॉ. अशोक उईके यांच्या नेतृत्त्वातील पॅनलने प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ना. हंसराज अहीर, भाजपाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याध्यक्ष रावसाहेब दानवे, ना. सुधीर मुनगंटीवार, ना.डॉ. रणजित पाटील, जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे आदींच्या प्रतिमांचा वापर फ्लेक्स आणि प्रचार पत्रकात करण्यात आला आहे. त्यातच नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शेतीविषयक कामांवर मतदारांना आवाहन करत अजूनही मोदी लाटेत ही निवडणूक जिंकण्याची आशा बाळगली आहे. माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांच्या नेतृत्त्वातील पॅनेल व बाजार समितीत सत्तारूढ अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर यांच्या नेतृत्त्वातील दोन्ही पॅनेलने सोनिया गांधी, राहुल गांधी, अशोक चव्हाण, वामनराव कासावार यांच्या प्रतिमांचा वापर प्रचार पत्रकात करून काँग्रेस पक्ष समर्थित पॅनल असा केला आहे. साधारणत: व्हीआयपी नेत्यांच्या प्रतिमांचा आणि आवाहनांचा उपयोग विधानसभा निवडणुकीत केला जातो. आता स्थानिक बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने सहकारातही हे चेहरे फलक आणि पत्रकावर दिसायला लागले आहे. या संस्थेच्या निवडणुकीचा प्रचार विधानसभेच्या प्रचाराच्या तोडीचा व प्रतिष्ठेचा राहिला. महागड्या वाहनांमधून महिनाभर खेड्यापाड्यात प्रचाराचा धुरळा उडविला. तीनही गटाने सोशल मीडियावरूनही प्रचार मोहीम राबविली.शासकीय मालमत्तेवर पॅनेलचा ताबाराळेगाव बाजार समिती निवडणुकीतील तीनही पॅनेलने सहकारी संस्था आणि शासनाच्या मालमत्तेवर ताबा मिळविला आहे. त्यांचे प्रचार कार्य याच ठिकाणाहून सुरू आहे. आमदार गटाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या व्हीआयपी सूटमध्ये बस्तान मांडले आहे. मानकर गटाने मध्यवर्ती बँकेच्या व्हीआयपी वातानुकुलीत विश्रामगृहाचा वापर सुरू केला आहे. पुरके गटाने वसंत सहकारी जिनिंगचे सभागृह प्रचार मोहिमेसाठी ताब्यात घेतले आहे.