शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

वर्धा येथील दरोड्यात ‘लायटर’ बंदुकीचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 05:00 IST

वर्धा येथील मुथ्थूट फायनान्समध्ये दरोडा टाकून नऊ किलो सोने, रोकड लुटण्यात आली होती. या गेम वाजवून दरोडेखोर घरी यवतमाळात पोहोचण्यापूर्वीच वर्धा पोलिसांनी धामणगाव रोडवर करळगाव घाटात त्यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून नऊ किलो सोने, रोकड, वाहने असा पावणे पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल  जप्त केले गेले. या दरोड्याचा मास्टर माईंड आणि घटनेला मुर्तरुप देणारे असे सर्वच यवतमाळचे निघाले.

ठळक मुद्देआरोपी यवतमाळातील : घरी पोहोचण्यापूर्वीच पोलिसांच्या जाळ्यात

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वर्धा येथील मुथ्थूट फायनान्समध्ये गुरुवारी सकाळी सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. मात्र या दरोड्यासाठी वापरलेले अग्नीशस्त्र रिव्हॉल्वर नसून लायटर बंदूक असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या दरोड्याचे थेट यवतमाळ कनेक्शनही उघड झाले आहे. वर्धा येथील मुथ्थूट फायनान्समध्ये दरोडा टाकून नऊ किलो सोने, रोकड लुटण्यात आली होती. या गेम वाजवून दरोडेखोर घरी यवतमाळात पोहोचण्यापूर्वीच वर्धा पोलिसांनी धामणगाव रोडवर करळगाव घाटात त्यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून नऊ किलो सोने, रोकड, वाहने असा पावणे पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल  जप्त केले गेले. या दरोड्याचा मास्टर माईंड आणि घटनेला मुर्तरुप देणारे असे सर्वच यवतमाळचे निघाले. त्यातील काहींची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचे पोलिसांनी सांगितले. वर्धाचे एसडीपीओ पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात वर्धा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश ब्राम्हणे यांनी ही कामगिरी केली. अवघ्या आठ तासात हा दरोडा उघडकीस आणला. दरोड्यातील आरोपींमध्ये यवतमाळातील जीवन गिरडकर (उज्वलनगर), खुशाल आगासे (कोल्हे ले-आऊट), कुणाल शेंद्रे (उज्वलनगर), मनीष गोडवे (सरदार चौक) यांचा समावेश आहे. महेश यापूर्वी येथे श्रीराम फायनान्समध्ये होता. तेथील सोन्याच्या प्रकरणात त्याचा पर्दाफाश झाला. त्यामुळे त्याने वर्धेत मुथ्थुट फायनान्समध्ये नोकरी शोधली. मात्र तेथे ही त्याने गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवल्याचे दरोड्यात मास्टर माईंड म्हणून रेकॉर्डवर आल्याने दिसून येते. महेशची पोलिसांनी उलट तपासणी केली आणि अवघ्या काही तासात मुथ्थूट फायनान्समधील दरोड्याचे नेमके वास्तव उघड झाले.

एकावर होता खुनाचा गुन्हामुथ्थूट फायनान्सचा एक अधिकारी महेश श्रीरंग रा. वर्धा हा या दरोड्याचा मास्टर माईंड निघाला. तो पूर्वीचा यवतमाळातील उज्वलनगरचा रहिवासी आहे.   जीवन याच्यावर यापूर्वीही शरीरासंबंधीचा गंभीर गुन्हा दाखल होता. तो आर्थिकदृष्ट्या सबळ आहे.  खुशालचे येथील वीरवामनराव चौकात होलसेल मेडिकल शॉप होते.  कुणालचे सुद्धा यवतमाळात अलिकडेच गाजलेल्या एका प्रकरणात कुठे तार जुळतात का याचा पोलीस तपास करीत आहे.  त्या प्रकरणात कामवाल्या बाईचा कुणाल नातेवाईक असल्याचे सांगितले जाते.  पोलीस दलाची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या त्या प्रकरणाचा अद्याप छडा लागलेला नाही, हे विशेष.  मनीष हा येथे गाजलेल्या काेट्यवधी रुपयांच्या भूखंड खरेदी घोटाळ्यातील आरोपी आहे. तो क्रिकेट बुकी आणि मटका बाजारातील चॅनलमध्येही काम करीत होता, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Robberyचोरी