शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
2
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
3
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
4
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
5
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
6
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
7
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
8
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
9
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक, कोण काय म्हणाले?
10
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
11
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
12
चंद्र-केतु ग्रहण योगात मोहिनी एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी नारायणाची कृपा, शुभ फले; घवघवीत यश!
13
BSNL नं आणली Mother's Day ऑफर, स्वस्त केले आपले ३ रिचार्ज प्लान्स; पाहा डिटेल्स
14
Operation Sindoor : "जे काही घडलं ते बरोबर, पहलगाममध्ये धर्म विचारणाऱ्या ४ दहशतवाद्यांचाही केला पाहिजे खात्मा"
15
विजापूरमध्ये भीषण चकमक; कर्रेगुट्टा टेकड्यांमध्ये लपलेल्या 15+ नक्षलवाद्यांचा खात्मा
16
त्यांनी महिलांना मारलं नाही पण...; पहलगाम हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी 'ऑपरेशन सिंदूर'वर काय म्हणाले?
17
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
18
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंग, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
19
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
20
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक

दारूच्या तस्करीसाठी अ‍ॅम्बुलन्सचा वापर

By admin | Updated: September 17, 2015 03:13 IST

शहरात बनावट दारूची निर्मिती केली जात असून ही दारू वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यात पोहोचविण्यासाठी चक्क एका ...

बनावट दारू : विक्री आज, नोंद घेतात उद्यायवतमाळ : शहरात बनावट दारूची निर्मिती केली जात असून ही दारू वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यात पोहोचविण्यासाठी चक्क एका राजकीय नेत्याच्या नावे असलेल्या दोन अ‍ॅम्बुलन्सचा सर्रास वापर केला जात असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. ‘लोकमत’ने बुधवारच्या अंकात ‘एक्साईजच्या वसुलीचे दरपत्रक’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून हप्त्याच्या रकमेचा संपूर्ण हिशेबच उघड केला. त्या पार्श्वभूमीवर दारू विक्रीतील अनेक गोंधळ उघड झाले आहे. त्यानुसार, यवतमाळातच बनावट दारूची निर्मिती करणारे शहर व परिसरात तीन ते चार कारखाने आहेत. या कारखान्यातील दारू जिल्ह्यातील अनेक बीअरबारमधून विकली जाते. हीच दारू वर्धा व चंद्रपूर या बंदी असलेल्या जिल्ह्यांमध्ये पोहोचविली जाते. ट्रक, मेटॅडोअर व अन्य वाहनांद्वारे होणारी दारूची ही वाहतूक पकडली जाण्याची भीती असते. म्हणून या दारूच्या तस्करीसाठी चक्क अ‍ॅम्बुलन्स वापरण्याचा फंडा या बनावट दारू निर्मितीचे कारखाने चालविणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांनी वापरला आहे. खाली दारू आणि वर कुणी तरी कार्यकर्ता रुग्ण म्हणून झोपलेला असे चित्र या अ‍ॅम्बुलन्समध्ये असते. सायरन वाजवित सर्रास या अ‍ॅम्बुलन्स वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यात दूरपर्यंत जातात. त्यात रुग्ण असावा असे समजून पोलिसांकडून त्याची कधीच तपासणी होत नाही. त्याचाच फायदा उठवित दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. या दोन अ‍ॅम्बुलन्स असून त्यातील एक मोठी व एक लहान आहे. राजकीय नेत्याच्या नावाने या अ‍ॅम्बुलन्स चालविल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात त्या आजतागायत रुग्ण कल्याणासाठी धावलेल्या नाहीत. त्याचा बहुतांश वापर हा दारूच्या निमित्तानेच झाला आहे. अ‍ॅम्बुलन्समधून होणारी ही दारूची तस्करी शोधण्याचे आव्हान राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांपुढे आहे. हीच बनावट दारू जिल्ह्यातील अनेक बीअरबारमधून विकली जाते. नियमानुसार दारू विक्री होताच ग्राहकाला त्याचे बिल मिळणे क्रमप्राप्त आहे. अर्थात या दारूची बारमधील रजिस्टरवर लगेच नोंद अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात हे रजिस्टर दुसऱ्या दिवशी भरले जाते. यवतमाळात ही रजिस्टर लिहिणारे तीन ते चार खास तरुण आहेत. सकाळपासून ते शहरातील आपल्या नियोजित बीअरबारमध्ये जाऊन आपल्या सोईने रजिस्टर ‘अपडेट’ करतात. त्यात बहुतांश क्रमांक एकची दारू व क्रमांक दोनची दारू अशी विभागणी असते. त्याचे रजिस्टरच वेगळे आहे. क्रमांक दोनच्या दारूचे रजिस्टर तपासण्याची तसदी कधी एक्साईजकडून घेतली जात नाही. सर्व काही ‘मिलीभगत’ असल्याने हे रजिस्टर तपासण्याचा प्रश्नच एक्साईजपुढे निर्माण होत नाही. हे रजिस्टर तपासू नये, रोजच्या रोज नोंद का घेतली नाही, ग्राहकाला बिल का देत नाही, हे विचारू नये म्हणूनच एक्साईजला नियमित पाकिट पोहोचविले जाते. ५ तारखेपर्यंत पाकीट न पोहोचले तरच एक्साईजची चमू बारमध्ये तपासणीच्या निमित्ताने सॅल्यूट ठोकण्यासाठी हजर होते, हे विशेष. वणीपासून उमरखेडपर्यंत हाच प्रकार सर्रास व राजरोसपणे सुरू आहे. त्याच्या लाभाचे अनेक वाटेकरी आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)