शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

यूपीएससीत जिल्ह्यातील तिघांची बाजी

By admin | Updated: June 3, 2017 00:42 IST

स्पर्धा परीक्षेकरिता फारसे अनुकूल वातावरण नसताना, अभ्यासाच्या सुविधा उपलब्ध नसताना

प्रतिकूलतेवर मात : आईवडिलांच्या स्वप्नांची पूर्ती, एसटी वाहकाच्या मुलाचा समावेश लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : स्पर्धा परीक्षेकरिता फारसे अनुकूल वातावरण नसताना, अभ्यासाच्या सुविधा उपलब्ध नसताना जिल्ह्यातील वणी, पुसद येथील दोन तरुणांनी, तर दिग्रस येथील तरुणीने प्रचंड मेहनतीने यूपीएससी परीक्षेत बाजी मारली. या सुपूत्रांची नावे आहेत, अदित्यविक्रम हिराणी, परीक्षित झाडे आणि प्रज्ञा खंदारे. यूपीएससी परीक्षेत वणीच्या अदित्यविक्रम मोहन हिराणी यांनी देशातून ११३ वा क्रमांक, तर मुळचे दिग्रस येथील आणि हल्ली पुसदमध्ये राहणारे परीक्षित संजय झाडे यांनी देशातून २८० वा क्रमांक, तर दिग्रसच्या प्रज्ञा कैलास खंदारे यांना ९८४ वी रँक मिळाली आहे. या तिघांनी जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे. अदित्यविक्रमचे वडील शेतकरी, आई गृहिणी, लहान भाऊ बारावीत असून बहीण बीए झाली. दहावीत आणि बारावीतसुद्धा तो गुणवत्ता यादीत आला. नंतर ईलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रूमेन्टेशनमधून त्याने बीई केले. नंतर एका कंपनीत नोकरीही केली. पण प्रशासकीय अधिकारी होण्याची इच्छा असल्याने त्यांनी यूपीएससीच्या तयारीसाठी दिल्ली गाठली. २०१३ मध्ये यूपीएससीची पहिली परीक्षा दिली, तो उत्तीर्णही झाला. मात्र रॅन्क न मिळाल्याने त्याला रक्षा मंत्रालयात सहायक संचालकपदावर नियुक्ती मिळाली. या नोकरीत असतानाच दुसऱ्यांदा परीक्षा देऊन देशातून ११३ वी रॅन्क मिळविली. त्यामुळे आता त्याला प्रशासकीय सेवेत अधिकारी बनण्याची संधी मिळणार आहे. वडिलांसाठी परीक्षितचे एमबीबीएस परीक्षितचे वडील संजय झाडे हे परिवहन महामंडळात वाहक होते. घरच्या सामान्य आर्थिक परिस्थितीवर मात करून मुलाला शिकविण्यासाठी आईने शिकवण्या घेतल्या. परीक्षितचे प्राथमिक शिक्षण दिग्रसच्या मॉन्टेसरी स्कूलमध्ये झाले. वडिलांच्या इच्छेखातर परीक्षित यांनी पहिले नागपूर येथे एमबीबीएस पूर्ण केले. नंतर स्पर्धा परीक्षेची तयारी केली. परिश्रमातून मुलाला घडविल्याबद्दल त्यांच्या आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विदर्भ भावसार समाजाचे माजी उपाध्यक्ष अविनाश लखपती, युवा क्रांती संघटनेचे सचिन मुधोळकर उपस्थित होते. एमपीएससी सर, आता यूपीएससीतही नंबर! प्रज्ञा कैलास खंदारे या दिग्रसच्या नगरपरिषद शाळेच्या विद्यार्थिनी. पाचवी ते दहावीचे त्यांचे शिक्षण मोहनाबाई कन्या विद्यालयात, तर अकरावी-बारावी गावातीलच हिंद विद्यालयात झाले. कम्प्यूटर सायन्समध्ये त्यांनी शेगावात बीई केले. त्याचवेळी त्यांनी स्पर्धा परीक्षेचीही तयारी सुरू केली. पुणे आणि दिल्ली येथे जाऊन त्यासाठी प्रज्ञा खंदारे यांनी तयारी सुरू केली. २०१५ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन पहिल्याच प्रयत्नात त्या उत्तीर्ण झाल्या. त्यातून अकोला महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यावर न थांबता त्यांनी यूपीएससीची तयारी केली. पहिल्याच प्रयत्नात त्यांना ९८४ वी रँक मिळाली. शिक्षक वडील कैलास व आई रंजना खंदारे यांचे त्यांना पूर्ण पाठबळ मिळाले.