राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील मध्यवस्तीत असलेले दारूचे दुकान बंद करावे, या मागणीसाठी झाडगाव येथील ३०० महिला मंगळवारी राळेगाव तहसील आणि पोलीस ठाण्यावर धडकल्या. यापूर्वी या महिलांनी ग्रामपंचायतीसमोर धरणे दिले. दरम्यान बुधवारी ग्रामपंचायतीने महिलांची विशेष सभा घेऊन गावातील दारू दुकान बंद करण्याचा एकमुखाने ठराव घेतला. ग्रामपंचायत ठरावाची प्रत घेऊन महिला तहसील कार्यालय आणि राळेगाव ठाण्यात पोहोचल्या. या ठरावाची प्रत संबंधितांना देऊन दारूचे दुकान बंद करण्यासंबंधी कारवाई करण्याची मागणी केली. ग्रामपंचायतीने केलेल्या ठरावाचा महिलांनी जल्लोष केला. मात्र आता तहसील प्रशासन काय भूमिका घेते याकडे या महिलांचे लक्ष लागले आहे.
दारूबंदीसाठी एकजूट :
By admin | Updated: March 25, 2015 00:00 IST