शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेसाठी एकवटले उमरखेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:18 IST

स्वच्छतेचा ध्यास घेत नागरिक, विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांनी गुरूवारी शहरातून स्वच्छता रॅली काढली. नगरपरिषदेने रॅलीसाठी पुढाकार घेतला. स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ अंतर्गत शहरात स्वच्छतेचा संदेश देत ही रॅली निघाली.

ठळक मुद्देस्वच्छता महारॅली : नागरिक, विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : स्वच्छतेचा ध्यास घेत नागरिक, विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांनी गुरूवारी शहरातून स्वच्छता रॅली काढली. नगरपरिषदेने रॅलीसाठी पुढाकार घेतला.स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ अंतर्गत शहरात स्वच्छतेचा संदेश देत ही रॅली निघाली. रॅलीत सहभागी विद्यार्थ्यांनी नागरिकांना आपल्या घरातील ओला व सुका कचरा कसा वेगळा ठेवावा, जमा झालेल्या कचºयाचे कंपोस्ट खत कसे तयार करावे, आपला परिसर स्वच्छ व निरोगी ठेवण्यासाठी नागरिकांनी काय करावे, आदी संदेश दिले. नागरिकांनी स्वच्छतेसाठी सहकार्य करून ‘स्वच्छ उमरखेड-सुंदर उमरखेड’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरावी, याकरिता शहरातील मूख्य मार्गाने रॅली काढण्यात आली. उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडाणिस यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी तहसीलदार भगवान कांबळे, नगराध्यक्ष नामदेव ससाणे, उपाध्यक्ष अरविंद भोयर, मुख्याधिकारी गणेश चव्हाण, ठाणेदार हनुमंत गायकवाड, नगरसेवक नितीन भुतडा, प्रकाश दूधवार, संदीप ठाकरे, गजानन ठाकरे, कविता खंदारे, अनुप्रिता देव, बाळासाहेब नाईक यांच्यासह ब्रॅन्ड अंबेसेडर जयशंकर जवणे, दीपक ठाकरे, व्यंकटेश पेंशनवार उपस्थित होते.सर्व सामाजिक संघटनांनी एकत्र येत रॅलीतून स्वच्छतेचा संदेश दिला. या रॅलीमध्ये शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थी सहभागी होते. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी पथनाट्यातून स्वच्छतेचा संदेश दिला .