शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेडच्या डॉक्टरांची रक्षाबंधनला अनोखी ओवाळणी

By admin | Updated: August 19, 2016 01:10 IST

डॉक्टर म्हणजे रुग्णांकडून पैसे उकळणारा अशी काहीशी प्रतिमा समाजात निर्माण होत आहे.

सर्पदंश झालेल्या बालिकेला जीवदान : दीड लाखांचे बिल माफ, औषध विक्रेता-पॅथॉलॉजीचीही साथ अविनाश खंदारे उमरखेड डॉक्टर म्हणजे रुग्णांकडून पैसे उकळणारा अशी काहीशी प्रतिमा समाजात निर्माण होत आहे. मात्र उमरखेडच्या डॉक्टरांनी समाजाचा हा भ्रम आपल्या कृतीतून दूर केला. सर्पदंश झालेल्या एका बालिकेला जीवदानच दिले नाही तर तिच्या उपचार, औषध व नमुने तपासणीचे झालेले दीड लाख रुपये बिल माफ केले. रक्षाबंधनच्या दिवशी डॉक्टरमधील भावाने एका गरीब असहाय्य रुग्ण बहिणीला खऱ्या अर्थाने ओवाळणी घातली. उमरखेड तालुक्यातील साखरा येथील सिम्पल बापूराव बडवे (१३) हिला बारा दिवसांपूर्वी सर्पदंश झाला. तिला तात्काळ उमरखेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान ती बेशुद्ध पडली. नांदेडला घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र मोलमजुरी करणारे बडवे कुटुंब नांदेडला नेण्यास असमर्थ होते. कुणाच्या तरी सांगण्यावरुन उमरखेडच्या डॉ. श्रीकांत जयस्वाल यांच्या खासगी रुग्णालयात तिला भर्ती केले. त्याठिकाणी तिच्यावर दहा दिवस उपचार करण्यात आले. डॉ. श्रीकांत जयस्वाल, डॉ. संदीप वानखेडे, डॉ. स्वप्नील अग्रवाल, डॉ. शेख गौस, डॉ. सारिका वानखेडे, डॉ. श्रीराम शिंदे यांनी शर्थीचे प्रयत्न केले. सिम्पलचे प्राण वाचविले. ठणठणीत बरी झाल्यावर बुधवारी तिला सुटी दिली. तिच्या उपचाराचे बिल जवळपास एक लाख रुपये झाले होते. तसेच २५ हजाराची औषधीही उधारीवरच घेतली होती. पॅथॉलॉजीचे दीपक ठाकरे व बालाजी चिंचोळकर यांचेही बिल उधारच होते. गरीब परिस्थितीमुळे बील कसे द्यायचे, असा प्रश्न बडवे कुटुंबापुढे आला. परंतु या डॉक्टरांनी आपल्यातील माणुसकीचा प्रयत्य देत तब्बल एक लाख रुपयाचे बिल माफ केले. औषधी दुकानदार आणि पॅथॉलॉजी चालकानेही पैसे घेतले नाही. रक्षाबंधनच्या दिवशी या अनोख्या ओवाळणीने परिवार भारावून गेला. सिम्पलला मिळाले हक्काचे भाऊ सिम्पल बडवे ही हालाखीच्या परिस्थितीत जगणारी बालिका आई-वडील रोजमजुरी करतात. तिला भाऊ नाही तीन्ही बहिणी आहेत. दरवर्षी रक्षाबंधनाला भावाची कमतरता जाणवते परंतु यावर्षीच्या रक्षाबंधनाला तिच्यासाठी देवदूत ठरणारे डॉक्टरांच्या रुपाने अनेक भाऊ मिळाले.