यवतमाळ : सामाजिक, कौटुंबिक अन्यायाविरोधात पोलिसांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली. राज्य संघटक गणेश क्षीरसागर यांच्यासह उस्मानाबाद जिल्हा कार्यकारी अध्यक्ष अमोल रसाळ, उपाध्यक्ष अखलाख शेख, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष उमेश राठोड, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर निमगडे आदी मंचावर उपस्थित होते. यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीत कार्यकारी अध्यक्ष राजेश ठाकूर, जिल्हाध्यक्ष शाहेद सैयद, उपाध्यक्ष विनोद पत्रे, सचिव अतिक शेख, सहसचिव ओंकार करंदीकर, महिला जिल्हाध्यक्ष लीला मोहन मेश्राम, उपाध्यक्ष कल्पना राजू नागभिडकर यांचा समावेश आहे. पवन पथ्थे, मयूर बोरकर, इमरान शेख, आकाश वानखेडे, अभिषेक बोंडे, गोलू पुरके, प्रसिक गडलिंग, प्रवीण खोब्रागडे आदींची सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. या पदाधिकाऱ्यांना प्रमोद वाघमारे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. (वार्ताहर)
पोलिसांच्या न्याय्य हक्कासाठी संघटन
By admin | Updated: December 22, 2016 00:08 IST