शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत शासन प्रशासनात असमन्वय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 22:08 IST

जिल्हा परिषदेत लोकप्रतिनिधी विरूद्ध अधिकारी यांच्यातील वाद धुमसत आहे. शासन व प्रशासनातील असमन्वयाने कोंडी निर्माण झाली असून ती फोडणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देकोंडी कोण फोडणार? : लोकप्रतिनिधी विरुद्ध अधिकारी वाद धुमसला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेत लोकप्रतिनिधी विरूद्ध अधिकारी यांच्यातील वाद धुमसत आहे. शासन व प्रशासनातील असमन्वयाने कोंडी निर्माण झाली असून ती फोडणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.दर तीन महिन्यांनी होणाºया सर्वसाधारण सभेत सदस्य अधिकाºयांवर प्रश्नांचा भडीमार करतात. यावेळच्या सभेत शिक्षण आणि समाजकल्याण विभागावरून हा भडीमार सुरू झाला. नंतर वातावरण तापल्याने शिक्षणाधिकाºयांनाच सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा ठराव घेण्यात आला. नंतर अधिकाºयांनी जिल्हा परिषद अध्यक्षांना निवेदन देऊन थेट सदस्य आमचे मानसिक खच्चीकरण करीत असल्याचा आरोप केला. यावरून वाद धुमसत आहे.आता काही सदस्य पुढे सरसावले आहेत. सर्वसाधारण सभा सुरळीत पार पडली असताना अधिकाºयांनी अध्यक्षांना निवेदन सादर करून पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व सभेवर अविश्वास दर्शविल्याचा आरोप त्यांनी केला. सभेत वरिष्ठ अधिकारी उपस्थित असताना त्यांनी कोणत्याही विषयांवर आक्षेप का घेतला नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यामुळे विकासाच्या कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अखर्चित निधी, चालू वर्षात घ्यावयाच्या योजनांसाठी तातडीने विशेष सभा बोलविण्याची मागणीही आहे.अधिकारी विभागीय आयुक्तांच्या दरबारातजिल्हा परिषद अध्यक्षांना निवेदन दिल्यानंतर अधिकारी व विभाग प्रमुखांनी थेट विभागीय आयुक्तांच्या दरबारात धडकून आपले गाºहाणे मांडले. अधिकाºयांचे मानसिक खच्चीकरण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे हा वाद तूर्तास शमण्याची चिन्हे दिसत नाही. दरम्यान, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर वैद्यकीय रजेवर गेल्या आहेत. त्यांचा प्रभार माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.प्रधान सचिवांना बोलवाविशेष सर्वसाधारण सभेला ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव, विधी व न्याय विभागाचे सहसचिव, तसेच विभागीय आयुक्तांना निमंत्रित करावे, अशी मागणी सदस्य स्वाती येंडे यांनी केली. आता सर्व गटनेते आणि सदस्य कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, अधिकारी आणि पदाधिकारी पुणे येथे प्रशिक्षणासाठी गेल्याने शुक्रवारची स्थायी समितीची सभा रद्द होण्याची शक्यता आहे.