शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

गणवेशधारी कर्मचारी चहा टपरीवर

By admin | Updated: September 24, 2016 02:37 IST

जिल्हा परिषदेने अधिकारी, कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड लागू केला. सोमवार आणि शुक्रवारी हे अधिकारी, कर्मचारी गणवेषात येऊ लागले.

जिल्हा परिषद : कार्यालयीन वेळेत चकल्लस, तासन्तास असते उपस्थिती, कामे करतात तरी केव्हा ?यवतमाळ : जिल्हा परिषदेने अधिकारी, कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड लागू केला. सोमवार आणि शुक्रवारी हे अधिकारी, कर्मचारी गणवेषात येऊ लागले. परिणामी चहा टपरीवरही आता गणवेषधारी कर्मचारी चकल्लस करताना दिसून येत आहे.जिल्हा परिषदेने महत्प्रयासाने अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड लागू केला. काही कर्मचाऱ्यांनी या ड्रेस कोडला विरोधही केला. त्यांच्यापुढे नमते घेत अखेर प्रशासनाने ड्रेस कोडची सक्ती नसून अधिकारी, कर्मचाऱ्यांना गणवेष ऐच्छिक केला. एकाच गणवेषात असल्यास शिस्त दिसून पडते, म्हणून प्रशासनाने सुरूवातीला ड्रेस कोड सक्तीचा करण्याबाबत पावले उचलली होती. आता हा गणवेष ऐच्छिक आहे. मात्र त्यातून शिस्त दिसून येत असल्याने बहुतांश अधिकारी, कर्मचारी आता गणवेषात कार्यालयात येऊ लागले आहे.जिल्हा परिषदेत सोमवार आणि शुक्रवारी गणवेषातील अधिकारी, कर्मचारी दिसून येतात. यामुळे जिल्हा परिषदेत येणाऱ्या सामान्य नागरिकाला त्यांची शिस्तप्रियता कळून येते. प्रशासनाच्या या निर्णयाचे त्यांना कुतूहलही वाटते. मात्र तेच कर्मचारी ज्यावेळी कार्यालयीन वेळात रस्त्यांवरील चहा टपरीवर दिसून येतात, त्यावेळी सामान्य नागरिकांचा तिळपापड होतो. पूर्वी कर्मचारी गणवेषात नसल्याने चहा टपरीवर असलेले नागरिक कोण आहेत, हे ओळखू येत नव्हते. मात्र आता ते चक्क गणवेषातच टपरीवर चहा पिताना दिसत असल्याने त्यांच्या शिस्तीचा दिंढोरा पिटला जात आहे.गणवेषधारी कर्मचाऱ्यांना रस्त्यावरील चहा टपरीवर बघून नागरिकांना संताप येत आहे. विशेष म्हणजे कार्यालयीन वेळात ते तेथे दिसत असल्याने त्यांचा संताप रास्तही ठरत आहे. दुपारी २.३0 वाजताच्या मध्यान्ह काळात ते टपरीवर आढळल्यास कुणालाच आश्चर्य वाटत नाही. मात्र कार्यालयीन वेळात ते चहा पिताना दिसत असल्याने हे कर्मचारी नेमके काम कधी करतात, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. (शहर प्रतिनिधी)अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरजगणवेषातील कर्मचारी चहा टपरीवर दिसत असल्याने ड्रेस कोडच्या शिस्तीचेच वाभाडे निघत आहे. त्यातून ‘शिस्तप्रिय’ कर्मचाऱ्यांचे ओंगळवाणे दर्शन नागरिकांना घडत आहे. एकप्रकारे जिल्हा परिषद आणि प्रशासनाचे वाभाडे काढणारी ही शिस्तप्रियता ठरत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयीन वेळात नजिकच्या चहा टपऱ्यांवर चक्कर मारून याची खातरजमा करावी, अशी अपेक्षा सामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.