शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
3
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
4
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
5
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
6
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
7
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
8
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
9
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
10
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
11
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
12
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
13
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
14
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
15
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
16
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
17
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
18
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
19
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
20
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव

‘निर्मल भारत’ योजनेचा दिग्रसमध्ये फज्जा

By admin | Updated: March 26, 2016 02:20 IST

तालुक्यातील ग्रामीण भागातील असंख्य ग्रामस्थ आजही रस्त्याच्या कडेला उघड्यावर शौचास बसत असल्याने ग्रामीण भागातील ...

रस्ते अस्वच्छ : ग्रामीण भागात आरोग्य धोक्यातदिग्रस : तालुक्यातील ग्रामीण भागातील असंख्य ग्रामस्थ आजही रस्त्याच्या कडेला उघड्यावर शौचास बसत असल्याने ग्रामीण भागातील रस्ते शौचालय झाल्याचे विदारक चित्र गावागावांमध्ये पहायला मिळते. त्यामुळे शासनाच्या निर्मल भारत अभियान योजनेचा फज्जा उडाल्याचे चित्र स्पष्ट आहे. या अभियानाला शासनाकडून लाखो रुपयांचा निधी मिळत असताना त्याची निष्पती मात्र दिसून येत नाही. ग्रामीण भागातील आरोग्य चांगले रहावे, नागरिकांना कोणत्याही आजाराची लागण होऊ नये, साथींच्या आजारावर आळा बसावा यासाठी शासन लाखो रुपये खर्च करते. शासनाच्या घरोघरी शौचालयाचे बांधकाम होऊन त्याचा वापर व्हावा यासाठी विविध योजना अमलात आणल्या आहे. दारिद्र्य रेषेखालील जनतेला शौचालय बांधकामासाठी रोख दिल्या जात आहे. तरी देखील अपेक्षित असे परिणाम दिसून येत नाही. गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी नागरिकांमधून जे सहकार्य पाहिजे ते मिळताना दिसत नाही. तालुक्यातील बरेच असे गावे निर्मल ग्राम म्हणून निवडण्यात आले. व त्या ठिकाणी ही योजना राबविली. मात्र या गावांचीही परिस्थिती जैसे थेच आहे. शौचालय बांधण्यासाठी अनुदानातून अनेक ठिकाणी शौचालय पूर्ण होत नसल्याची ओरड आहे. मध्यस्थांच्या अर्थकरणातून शासनाच्या लोकोपयोगी योजनांची वाट लावली जात आहे.शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या इंदिरा आवास योजनेत घर व शौचालय बांधकामाची अट टाकण्यात आली आहे. परंतु या योजनेचा निधी हा संबंधित अभियंता व अधिकारी यांच्याच मर्जीने लाभार्थ्यांना दिला जातो. तालुक्यातील सावंगा, विठोली, तुपटाकळी, कलगाव, महागाव, आष्टा अशा असंख्य गावातील घरकुलाचे काम पूर्ण झाले असताना त्यांना अ‍ॅडव्हॉन्स निधी व्यतिरिक्त पैसे मिळालेले नाही. पूर्ण झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना पंचायत समितीमध्ये पायपीट करावी लागते. परंतु अधिकारी वर्ग लक्ष देत नाही. योजनेमध्ये लाभार्थी पात्र ठरला तरी अधिकारी-कर्मचारी धनादेश काढण्यासाठी चिरीमिरीची मागणी करून लाभार्थ्याला मानसिक व आर्थिक त्रास देतात. त्यामुळे योजना कोणतीही असो ती जोपर्यंत शासकीय यंत्रणेकडून प्रामाणिकपणे राबविली जात नाही, तोपर्यंत तिचे अपेक्षित असे सकारात्मक परिणाम दिसून येत नाही. लोकांनाही फायदा होत नाही. उसनवार करून शौचालयाचे काम करणाऱ्यांनाही अनुदानाचे पैसे त्वरित मिळत नाही. कामे पूर्ण असली तरी लाभार्थ्यांना हेलपाटे मारावे लागतात. (शहर प्रतिनिधी)