सचिंद्र प्रताप सिंह : जलयुक्त शिवार योजनेबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या तालुकास्तरावर बैठकायवतमाळ : रोजगार हमी योजनेंतर्गत अनेकांच्या हाताला हक्काचा रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे गावपातळीवर नरेगाची कामे घेऊन ती पूर्ण करण्याकडे ग्रामस्तरीय यंत्रणेचा पुढाकार असला पाहिजे. रोहयोत सरपंचांची भूमिका फार महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील सरपंचांनी रोहयोसह जलयुक्त शिवार समजून घेतले पाहिजे, असे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. नरेगा व जलयुक्त शिवारला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह तालुकास्तरीय बैठका घेत आहे. दारव्हा व नेर या दोन तालुक्यांचा ग्रामस्तरासह तालुका यंत्रणेचा त्यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, रोहयोचे उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, तहसीलदार राऊत यांच्यासह तालुकास्तरीय सर्व अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी रोहयोंतर्गत सुरू असलेल्या गावनिहाय कामांचा आढावा घेतला. नरेगांअर्गत घेतलेली कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी. गावातील नागरिकांची कामाची मागणी आल्यास त्यांना तातडीने काम उपलब्ध करून देण्यासाठी पुरेशी कामे सेल्फवर ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. नरेगातून सिंचन विहिरींची कामे सहज घेतली जाऊ शकतात. यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे विहिरींच्या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले. विहिरींसह शौचालयाच्या बांधकामाची कामे घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. नरेगा अंतर्गत कामे करणारे महसूल, पंचायत समिती, वन विभाग, सिंचन विभाग, पाणीपुरवठा, बांधकाम विभागांचा स्वतंत्र आढावाही त्यांनी घेतला. येत्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात ठिकठिकाणी नरेगाच्या कामांना प्रारंभ होऊन जिल्हा का कामांमध्ये सर्वाधिक चांगली प्रगती करणारा जिल्हा म्हणून ओळखला जाईल, इतके चांगले काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)काम न करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना काढानरेगा अंतर्गत विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणावर कंत्राटी अधिकारी व कर्मचारी नेमण्यात आले आहे. या कर्मचारी, अधिकाऱ्यांकडून चांगले काम होणे अपेक्षित आहे. परंतु अनेक जण त्यांना दिलेले उद्दिष्ट पूर्ण करीत नसल्याचे बैठकीत निदर्शनास आले. ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम समाधानकारक नसतील तशांच्या नियुक्त्या तत्काळ रद्द करण्याचे निर्देश बैठकीत जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले.
गावोगावच्या सरपंचांनी समजून घ्याव्या योजना
By admin | Updated: October 31, 2015 00:24 IST