शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

पशुधन पालनाचे महत्त्व समजून घ्या

By admin | Updated: August 9, 2015 00:10 IST

शेतीचे नियोजन करताना जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी पशुधन पालनाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे.

अधिकाऱ्यांना अपेक्षा : अंबोडा येथे शेतकरी जागृती अभियानमहागाव : शेतीचे नियोजन करताना जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी पशुधन पालनाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. कुठल्याही कामाचे नियोजन असल्यास शेतकरी मागे येणार नाही, असे मत अंबोडा येथे शेतकरी जागृती अभियानांतर्गत आयोजित शेतकरी जनसंवाद कार्यक्रमात अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. जनआंदोलन संघर्ष समितीचे अध्यक्ष जगदीश नरवाडे अध्यक्षस्थानी होते. अमृतराव देशमुख, दादाराव ठाकरे, हनवंतराव देशमुख यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. तालुक्यात शेतकरी आत्महत्या वाढत असताना प्रमुख अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांपर्यंत जाऊन काही नवीन उपाययोजना करता येते का, यासाठी हा प्रयोग करण्यात आला आहे, असे जगदीश नरवाडे यांनी आयोजनाची भूमिका मांडताना सांगितले. जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सोनकुसरे यांनी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी शेतीसोबतच पशुधन पालनाचे नियोजन केले पाहिजे. जोडधंदा म्हणून आपण दुग्ध व्यवसाय करतो. परंतु दूध देणाऱ्या जनावरांच्या चारा-पाण्याचे नियोजन करत नाही. नियोजनातील बारकावे समजून घेतले तरच दुग्ध व्यवसायात अपेक्षित वाढ होईल. कर्जपुरवठ्यासाठी आम्ही कटिबद्ध आहो. शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करण्याची क्षमता निर्माण करावी. बँक साखळी पद्धतीने चालते. साखळी थांबली तर पुढील ग्राहक थांबला म्हणून समजा. बँकेच्या धोरणाचा फायदा घ्या, असे यावेळी स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक सोनकांबळे यांनी सांगितले. जलशिवार योजनेच्या माध्यमातून सिंचन सुविधांचे स्त्रोत गावागावांत पोहोचत आहे. याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा, असे तालुका कृषी अधिकारी आर.डी. राठोड म्हणाले.विद्युत कंपनीचे सहाय्यक उपअभियंता गजभिये यांनी वीज पुरवठ्याबाबत गावकऱ्यांची असलेली मागणी जवळपास पूर्ण केल्याचे सांगितले. मागणीनुसार डीपी देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. पांदण रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन नायब तहसीलदार श्याम पांडे यांनी दिली. प्रसंगी गटविकास अधिकारी पी.डी. शेळके यांनी पंचायत समितीसंदर्भातील तक्रारींचा निपटारा केला. या कार्यक्रमात तालुक्यातील काही प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ.शिंदे यांनी संचालनाची जबाबदारी पार पाडली. (शहर प्रतिनिधी)