शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईतील पाणीपुरवठा नियमांच्या कचाट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 22:05 IST

शहरातील भीषण पाणीटंचाईच्या काळात टँकरच्या मागणीनुसार टँकर लावण्यात आले. २०१७ च्या कराराचा आधार घेऊन २०१८ मध्ये पाणी वाटप केले. याबाबत संबंधित कंत्राटदाराने वारंवार अवगत करूनही नगरपरिषद प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करून आदेश दिले.

ठळक मुद्देदीड कोटी थकले : टँकर चालक आंदोलन करणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील भीषण पाणीटंचाईच्या काळात टँकरच्या मागणीनुसार टँकर लावण्यात आले. २०१७ च्या कराराचा आधार घेऊन २०१८ मध्ये पाणी वाटप केले. याबाबत संबंधित कंत्राटदाराने वारंवार अवगत करूनही नगरपरिषद प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करून आदेश दिले. आता देयके काढताना शासनाच्या निकषांवर बोट ठेवले जात आहे. त्यामुळे दीड कोटी रुपयांची देयके थकली आहे. यासाठी टँकर चालकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.नगरपरिषदेने ३० मे २०१७ मध्ये दोन हजार ४५० रुपये प्रति दिवस या प्रमाणे टँकर भाडे तत्वावर घेण्याचा करार केला होता. याच कराराचा आधार घेऊन २०१८ मध्ये संपूर्ण उन्हाळ्यातभरच नव्हे तर जून महिन्यापर्यंत टँकरने पाणीपुरवठा केला. मात्र दरम्यानच्या काळात राज्य शासनाने टँकरची देयके देताना जीपीएस सिस्टीमच्या अहवालावरूनच दिली जावी, असे स्पष्ट केले. याबाबत टँकर चालकाने आदेश निघताच प्रशासनाला अवगतही केले. मात्र टँकरला मुदतवाढ देऊन शहरात एक नव्हे तर तब्बल ६३ टँकर लावण्यात आले. वर्षभरापूर्वी केलेल्या निविदा प्रक्रियेचा आधार घेऊन हे टँकर लावण्यात आले. आता देयके देताना शासन आदेशाच्या अधीन राहूनच फेरीप्रमाणे देयके दिली जातील, असा प्रस्ताव नगरपालिकेने ठेवला आहे. तर कंत्राटदाराने २०१७ च्या कराराप्रमाणेच देयके मिळावीत यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. नगरपरिषदेकडे दीड कोटींची थकबाकी असून ही रक्कम शासनाकडून मिळविण्यासाठी टँकरच्या ट्रीप प्रमाणे अहवाल सादर करावा लागणार आहे. आता पालिका प्रशासन या समस्येवर नेमका तोडगा कसा काढतो, हे महत्वाचे ठरणार आहे. टँकर चालक मात्र कंत्राटदार आणि प्रशासनातील विसंवादामुळे चांगलेच अडचणीत आले आहे. स्वखर्चाने डिझेल टाकून टंचाई काळात पुरवठा केला आहे. 

टॅग्स :water transportजलवाहतूक