शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

आमदारांच्या नेतृत्वात सावकारग्रस्तांची धडक

By admin | Updated: May 24, 2017 00:27 IST

सावकारग्रस्त शेतकरी मंगळवारी मुंबईच्या आमदार विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वात जिल्हा उपनिबंधक कार्यालयावर धडकले.

जिल्हा उपनिबंधक कार्यालय : शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या, वेगवान सुनावणीचे निर्देश लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : सावकारग्रस्त शेतकरी मंगळवारी मुंबईच्या आमदार विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वात जिल्हा उपनिबंधक कार्यालयावर धडकले. त्यांनी समस्यांचा पाढा वाचून जिल्हा उपनिबंधकांना फास्ट ट्रॅक कोर्टच्या धर्तीवर शेतकऱ्यांच्या तक्रारींची सुनावणी घेण्याचे निर्देश दिले. २००२ पासून जिल्ह्यात अवैध सावकारीच्या १९२ तक्रारी पुढे आल्या. कायद्यातील त्रुटींमुळे निम्मी प्रकरणे खारीज झाली. ४९ प्रकरणांची अद्याप सुनावणी सुरू आहे. यात २० प्रकरणांत अवैध सावकारी सिद्ध झाली. त्यामुळे तक्रारकर्त्या शेतकऱ्यांची स्थावर मालमत्ता परत करण्याची कारवाई सुरू आहे. मात्र कायद्यातील पळवाटांचा लाभ घेत काही सावकारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. तथापि अनेक प्रकरणात तक्रार दिल्यानंतरही फौजदारी कारवाई झाली नाही. यामुळे सावकार बिनबोभाटपणे गावात फिरत आहेत, असे आमदार विद्या चव्हाण यांनी डीडीआर गौतम वर्धन यांच्या निदर्शनास आणून दिले. तक्रारकर्त्या शेतकऱ्यांविरूद्ध दमदाटी करून खोटे गुन्हे दाखल केले जातात. काही प्रकरणात सुनावणीअंती शेतकऱ्याला शेतीचा ताबा देण्याचे आदेश झाले. मात्र पोेलीस संरक्षण न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांना शेताचा ताबाच मिळाला नाही, अशी माहिती शेतकऱ्यांनी आमदार चव्हाण यांना दिली. अकोलाबाजारमध्ये एकाच सावकाराने १५० एकर जमीन हडपली. त्याच्या घरी धाड टाकून दस्तावेज जप्त करण्यात आले. मात्र त्याला अटक झाली नाही, अशी कैफीयत सावकारग्रस्त शेतकरी संघर्ष समितीने मांडली. मावळणी येथे एका सावकाराविरूद्ध ३० तक्रारी असून त्याने २०० एकर जमिनीची हेराफेर करून ती परस्पर विकली. जिल्हा उपनिबंधकांनी या प्रकरणात स्वत: पाऊल उचलून तत्काळ निकाल द्यावा. कोर्टात अ‍ॅफेडेव्हीट दाखल करावे, असे निर्देश चव्हाण यांनी दिले. तसेच फास्ट ट्रॅक कोर्टच्या धर्तीवर सुनावणी घेण्याची सूचना दिली. यावेळी जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन, अर्चना माळवी, सावकारग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे घनशाम दरणे, मनीषा काटे यांच्यासह विविध तालुक्यातून आलेले शेतकरी उपस्थित होते. ३१ मे रोजी विशेष बैठक सावकारग्रस्त शेतकऱ्यांची कैफीयत जाणून त्यांची प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यासाठी येत्या ३० मे रोजी बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत सावकारग्रस्त शेतकरी, जिल्हा उपनिबंधक, विधान परिषदेच्या आमदार, सहाय्यक निबंधक आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत.