शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मारेगाव तालुक्यात अनधिकृत वीज कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 05:00 IST

मारेगाव तालुक्यात लाखाच्यावर घरगुती वीज जोडणी असून तीन हजार कृषी पंपाच्या वीज जोडण्या आहेत. या दोन्ही  वीज जोडणीची देयके थकलेली आहेत. लॉकडाऊनच्या काळात वीज बिल माफ होण्याच्या आशेने अनेक ग्राहकांनी देयकाचा भरणा केला नाही. नंतर एकाच वेळेस ग्राहकांना मोठ्या रकमेचे देयके प्राप्त झाल्याने मजूरदार व सर्वसामान्य ग्राहक या देयकाचा भरणा करू शकली नाही. त्यामुळे वीज वितरणने थकीत ग्राहकांची वीज खंडित केली. परंतु विजेच्या प्रकाशात राहायची सवय पडलेल्या या ग्राहकांनी आकोडे टाकून वीज जोडणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : वीज कंपनीकडून वारेमाप येणारी वीज देयके आणि लॉकडाऊनमध्ये वीज बिल माफीच्या आशेने थकलेली देयके, यामुळे अनेक वीज ग्राहकांकडे थकबाकी वाढली. सूचना देऊनही ग्राहक बिलाचा भरणा करीत नसल्याने वितरण कंपनीने अनेकांचा वीज पुरवठा खंडित केला. परिणामी विजेच्या प्रकाशात राहायची सवय पडलेल्या नागरिकांनी आता आकोडे टाकून वीज जोडण्या सुरू केल्याचे चित्र तालुक्यात आहे. तसेच कृषी पंपाच्या जोडण्याही अनधिकृत असल्याची माहिती समोर येत आहे.मारेगाव तालुक्यात लाखाच्यावर घरगुती वीज जोडणी असून तीन हजार कृषी पंपाच्या वीज जोडण्या आहेत. या दोन्ही  वीज जोडणीची देयके थकलेली आहेत. लॉकडाऊनच्या काळात वीज बिल माफ होण्याच्या आशेने अनेक ग्राहकांनी देयकाचा भरणा केला नाही. नंतर एकाच वेळेस ग्राहकांना मोठ्या रकमेचे देयके प्राप्त झाल्याने मजूरदार व सर्वसामान्य ग्राहक या देयकाचा भरणा करू शकली नाही. त्यामुळे वीज वितरणने थकीत ग्राहकांची वीज खंडित केली. परंतु विजेच्या प्रकाशात राहायची सवय पडलेल्या या ग्राहकांनी आकोडे टाकून वीज जोडणी केली. आज ग्रामीण भागात आकोडे टाकून वीज चोरी होत असल्याचे प्रमाण खूप वाढले आहे. काही वर्षांपूर्वी रात्री आकोडे टाकून वीज चोरी व्हायची. आता तर दिवस-रात्र अनधिकृत आकोडे टाकून वीज चोरी होत आहे. वीज वितरणचे कर्मचारी चिरीमिरी घेऊन या प्रकाराकडे डोळेझाक करीत आहे. याचा भुर्दंड सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे, तर दुसरीकडे कृषी पंपाच्या वीज जोडण्यातही मोठा घोळ आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कृषी पंपाच्या जोडण्या आहेत. परंतु जोडण्या केल्या तेव्हापासून  या शेतकऱ्यांना देयकेच पाठविली गेली नाहीत. विशेष म्हणजे बऱ्याच कृषी पंप जोडणीची कार्यालयात नोंदच नाही. अनेक कृषी पंप ग्राहकांची नावे कार्यालयातून गायब आहेत. तालुक्यात विजेची मोठ्या प्रमाणात चोरी सुरू असताना महावितरण कंपनीकडून साधी चौकशीही होताना दिसत नाही. गेल्या अनेक वर्षात चोरीच्या कार्यवाहीचा आकडा नगण्य आहे. अनेकांचे मीटर बंद आहे. त्यामुळे वीज चोरी करणाने बिनधास्त झाले आहेत. 

१०५ गावांसाठी केवळ दोनच लाईनमन - तालुक्यात १०५ गावे आहेत. या १०५ गावासाठी केवळ दोन लाईनमन आहे. तर एका हेल्परकडे १५ ते २० गावाचा भार आहे. त्यामुळे वीज बिघाड व थकीत वसुली ही दोन कामेच ही मंडळी करीत असतात. आकोडे टाकून होणाऱ्या वीज चोरीची हेल्परला पूर्ण कल्पना असून चिरीमिरी घेऊन हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे अनेकांच्या घरातील प्रकाशाला आकोड्याचा आधार मिळाल्याचे चित्र आहे. 

 

टॅग्स :electricityवीज