शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
2
विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...
3
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
4
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
5
९ महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज अन् आज फेसबुकवर शेवटचा मेसेज लिहून जोडप्यानं संपवलं आयुष्य
6
शिवानी सोनारने घरी आणली Tata कंपनीची नवी कोरी कार, गाडीची किंमत माहितीये?
7
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
8
दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!
9
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
10
नात्यांना काळीमा फासणारी घटना; रेशन कार्ड बनवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला अन् बायको पोरांना विकून आला!
11
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
12
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
13
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
14
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
15
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
16
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
17
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
18
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
19
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
20
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत

भर शहरात अनधिकृत कचरा डेपो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 21:31 IST

स्वच्छ भारत मिशनमध्ये रँकिंग मिळाल्याच्या वल्गना नगरपरिषदेकडून करण्यात आल्या. प्रत्यक्षात शहरातील स्थिती अतिशय बिकट आहे. आर्णी मार्गावर असलेल्या नगरपरिषदेच्या खुल्या जागेत अनधिकृत कचरा डोपो थाटला आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये पावसाचे पाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे साथरोगाचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देयवतमाळ पालिकेचा कारभार । घंटागाड्या रिचविण्यासाठी जागाच नाही, आर्णी मार्गावर दुर्गंधी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्वच्छ भारत मिशनमध्ये रँकिंग मिळाल्याच्या वल्गना नगरपरिषदेकडून करण्यात आल्या. प्रत्यक्षात शहरातील स्थिती अतिशय बिकट आहे. आर्णी मार्गावर असलेल्या नगरपरिषदेच्या खुल्या जागेत अनधिकृत कचरा डोपो थाटला आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये पावसाचे पाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे साथरोगाचा धोका निर्माण झाला आहे.नगरपरिषद आरोग्य विभाग प्रत्येक पावसाळ््यात अभ्यंकर कन्या शाळेसमोर असलेल्या खुल्या जागेत कचरा साठवत आहे. यामुळे त्रस्त नागरिक तक्रारी करतात. त्यानंतर पालिकेकडून थातूरमातूर व्यवस्था केली जाते. हा प्रकार नित्याचाच झाला आहे. एकीकडे स्वच्छ शहरासाठी कचरा विलगीकरणाची संकल्पना राबविली जात असल्याचे सांगण्यात येते. स्वच्छता कंत्राटदारासोबत करार केल्यानंतर त्यामध्ये कचरा विलगीकरण आणि दैनंदिन कचºयाची रोज विल्हेवाट लावण्याचे नमूद केले आहे. त्यानंतरही करारातील अटींचे पालन होताना दिसत नाही. जागा मिळेल तिथे कचरा टाकला जात आहे. नागरिकांचा दबाव वाढल्यानंतर तो उचलण्यात येईल असे सांगितले जाते. प्रत्यक्ष जितका कचरा तेथे टाकतात, त्याच्या पाच ते दहा टक्के कचरा उचलला जातो. या ढिगाºयामध्ये पावसाचे पाणी मुरल्याने उग्र दर्प येत आहे. दत्त चौकात जाणाºया मार्गावर अक्षरश: नाक बंद करूनच जावे लागते. माशा व डासांची उत्पत्ती नगरपरिषदेकडून केली जात आहे. यामुळेच शहरात डेंग्यू व हिवतापाचे रुग्ण आढळतात. कचरा विलगीकरण तर दूरच तांत्रिक निर्देशाचेही पालन केले जात नाही. तीन प्रभागातील कचरा एकाच ठिकाणी दररोज साठविला जात आहे. आरोग्य विभागाने याचे नियोजन करणे आवश्यक आहे. मागील पाच वर्षापासून ही समस्या सतावत असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. यावर अद्यापपर्यंत कायमस्वरूपी तोडगा काढला नाही. उलट महिन्याकाठी स्वच्छतेची लाखो रूपयांची देयके काढली जात आहे. नगरपरिषदेच्या एकूूण खर्चापैकी मोठी रक्कम घनकचरा व्यवस्थापनावर खर्च होते. त्यानंतरही परिस्थिती सुधारलेली नाही. आरोग्य विभागाकडून साथरोग टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात आली नाही.नगरसेवक आंदोलन करण्याच्या तयारीतशहरातील विविध प्रभागातून गोळा केलेला कचरा टाकण्यासाठी नगरपरिषदेकडे जागाच नाही. त्यामुळे रात्री अथवा पहाटे जागा मिळेल तिथे कचरा टाकला जात आहे. पावसाळ्यात घरात कचरा ठेवणेही शक्य होत नाही. त्यामुळे नगरसेवकांवर दबाव वाढत आहे. प्रशासनाला वारंवार निवदेन देऊनही तोडगा काढला जात नाही. यामुळे नगरसेवक उग्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.

टॅग्स :dumpingकचरा