शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, बारावीच्या परीक्षेवर १५ हजार शिक्षकांचा अघोषित बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 17:06 IST

अनुदानाच्या मागणीसाठी जवळपास दरवर्षी विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक परीक्षेवर बहिष्काराची भाषा करतात. मात्र, यंदा विभागातील चक्क ‘फुल्ल पगारी’ शिक्षकांनीच अघोषित बहिष्काराचा पवित्रा घेतला आहे.

ठळक मुद्देपगारी शिक्षकांचा उदासीन पवित्राबोर्डाच्या आदेशाला विभागातील शाळांची केराची टोपली

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अनुदानाच्या मागणीसाठी जवळपास दरवर्षी विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक परीक्षेवर बहिष्काराची भाषा करतात. मात्र, यंदा विभागातील चक्क ‘फुल्ल पगारी’ शिक्षकांनीच अघोषित बहिष्काराचा पवित्रा घेतला आहे. दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी परीक्षक, नियामक होण्यासाठी बोर्डाने माहिती मागवूनही १५ हजार शिक्षकांनी नकार दर्शविला आहे. त्यामुळे बोर्डही पेचात पडले आहे.दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे पेपर तपासण्यासाठी दरवर्षीच शिक्षक अनुत्सुक असतात. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ दरवर्षी शाळांकडून शिक्षकांची माहिती मागविते आणि अशा शिक्षकांना पेपर तपासणीचे काम सोपविते. मात्र, बहुतांश शिक्षक या कामाला नकार कळवितात. त्यावर उपाय म्हणून यंदा अमरावती विभागीय मंडळाने शिक्षकांकडूनच स्वेच्छेने नोंदणी करवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी शिक्षकांपर्यंत आॅनलाईन लिंकही पोहोचविली. मात्र, महिना उलटूनही शिक्षकांनी या लिंकवर माहिती भरलेली नाही.बोर्डाने जबाबदारी दिल्यास पेपर तपासणीचे काम हे शिक्षकांना बंधनकारक असते. तो त्यांच्या सेवेचाच भाग असतो. विशेष म्हणजे, या कामासाठी अल्प का होईना मानधनही दिले जाते. तरीही पेपर तपासणीला अनेक शिक्षक नकार देतात. यंदा तर सरळ-सरळ हे काम सामूहिकरीत्याच नाकारण्यात आल्याचे चित्र आहे. अमरावती विभागात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिकविणारे २२ हजार ३०० शिक्षक आहेत. त्यासर्वांकडून बोर्डाने आॅनलाईन नोंदणीचे निर्देश दिले होते. तरीही १५ हजार ६७३ शिक्षकांनी नोंदणी टाळलेली आहे. यामुळे अमरावती विभागीय मंडळाच्या सचिवांनी यवतमाळसह अमरावती, अकोला, बुलडाणा वाशीमच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांवर चांगलीच नाराजी व्यक्त केली.विद्यार्थी परीक्षेला मुकणारज्या शिक्षकांनी परीक्षेच्या कामासाठी नोंदणी टाळलेली आहे, त्यांच्या विरुद्ध बोर्डानेही आता कठोर पवित्रा घेतला आहे. नोंदणी टाळणाºया शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधून परीक्षेसाठी भरले जाणारे आवेदनपत्र स्वीकारण्यास बोर्डाच्या अमरावती विभागीय कार्यालयाने नकार दिलेला आहे. याबाबत विभागीय सचिवांनी शिक्षणाधिकाºयांना खरमरीत पत्र पाठविले असून अशा शाळेतील विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे व चालानही नाकारण्यात येईल, अशी तंबी दिली आहे. त्यामुळे शिक्षकांनी परीक्षेचे काम नाकारल्यास त्यांचे विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची दाट शक्यता आहे.नोंदणी टाळणारे शिक्षक- अकोला : २५८४- अमरावती : ४६५४- बुलडाणा : ३२८४- यवतमाळ : ३३४१- वाशीम : १८१०

टॅग्स :examपरीक्षा