शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेड वन विभागाच्या इमारती मोडकळीस

By admin | Updated: June 13, 2017 01:22 IST

शहराच्या मध्य वस्तीत असलेले वन विभागाचे कार्यालय मोडकळीस आले असून सुरक्षा भिंतही उद्ध्वस्त झाली आहे.

सुरक्षा भिंत उद्ध्वस्त : कर्मचारी निवासस्थाने ओस, मोकाट जनावरांचा सुळसुळाट, दुरुस्तीचे नाव नाहीदत्तात्रय देशमुख । लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : शहराच्या मध्य वस्तीत असलेले वन विभागाचे कार्यालय मोडकळीस आले असून सुरक्षा भिंतही उद्ध्वस्त झाली आहे. कर्मचारी निवासस्थाने ओस पडली असून या कार्यालय परिसरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट असतो. अशा दयनीय अवस्थेत कार्यालय सुरू असताना दुरुस्तीसाठी मात्र उपाययोजना केल्या जात नाही.शहराच्या मध्यवस्तीत आणि नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गालगत उपविभागीय वन अधिकारी आणि वन परिक्षेत्र अधिकारी यांचे कार्यालय आहे. लगतच कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने आहे. गेल्या कित्येक वर्षापासून वन विभागाचा कारभार येथून चालविला जातो. परंतु अलिकडच्या काळात कार्यालयाची दयनीय अवस्था झाली आहे. या दोन्ही कार्यालयाला असलेली संरक्षक भिंत पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे मोकाट जनावरांचा ठिय्या असतो. एवढेच नाही तर पावसाळ्यात रस्त्यावरील पाणी थेट वन कार्यालय परिसरात घुसते. कार्यालयाच्या इमारतीचीही पडझड झाली असून निवासस्थाने दयनीय अवस्थेत आहेत. सात ते आठ कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधली आहे. परंतु कधीच डागडुजी करण्यात आली नाही. परिणामी अनेक कर्मचारी शहरात राहणे पसंत करतात. सुरक्षा भिंत, निवासस्थाने दुरुस्तीचा प्रस्ताव पाठविण्यातच आला नाही. त्यामुळे येथील अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. विशेष म्हणजे, येथील दयनीय अवस्था पाहून वन्यजीव विभागाचे कार्यालय जेवली येथे हलविण्यात आले आहे. लाखो रुपये खर्चून उभारलेले कार्यालय आज अतिशय दयनीय अवस्थेत पडून आहे. या इमारतींची डागडुजी करावी, अशी मागणी वन विभागातील कर्मचाऱ्यांसह नागरिक करीत आहे.वाहने भंगारातउमरखेड वन विभागाला शासनाने वाहने दिली होती. परंतु गेल्या चार वर्षापासून ही वाहने भंगारात पडली आहेत. शासकीय कार्यालयाच्या आवारात ही वाहने उभी असून ती गंजली आहे. या वाहनांच्या जुजबी दुरुस्तीकडे त्यावेळी दुर्लक्ष केल्याने लाखो रुपयांची वाहने आज त्या ठिकाणी उभी आहेत.