शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेड तालुक्यात कडब्याचे भाव भिडले गगनाला

By admin | Updated: July 10, 2014 23:55 IST

हक्काचे नक्षत्र कोरडे गेल्यामुळे परिसरात अवर्षणप्रवण स्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षीच्या फटक्यातून सावरण्यापूर्वीच यंदाही पावसाने शेतकऱ्यांशी क्रूर डाव खेळल्यामुळे शेतकऱ्यांचे मात्र

उमरखेड : हक्काचे नक्षत्र कोरडे गेल्यामुळे परिसरात अवर्षणप्रवण स्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षीच्या फटक्यातून सावरण्यापूर्वीच यंदाही पावसाने शेतकऱ्यांशी क्रूर डाव खेळल्यामुळे शेतकऱ्यांचे मात्र पूरते अवसान गळाले आहे. जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभीर वळणावर असून कडब्याच्या पेंडीचे भावही गगनाला भिडले आहेत. पावसाने दडी मारल्यामुळे सिंचन तलाव, नदी-नाले संपूर्णत: कोरडे ठण्ण पडले आहेत. पेरणीची आशा गमावून बसलेल्या शेतकऱ्यांना आता पशुधन कसे वाचवावे, हा प्रश्न पडला आहे. ओला चाऱ्याबरोबरच सुक्या चाऱ्याचीही तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गोठ्यात असलेले पशुधन वाचविण्यासाठी शेतकरी जीवाचा आटापिटा करीत आहे. मृग आणि आर्द्रा नक्षत्रातील पावसाच्या दडीमुळे जमिनीवर गवतसुद्धा उगवले नाही. ओला चारा नष्ट झाला आहे. सुक्या चाऱ्याच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांना कडब्याची एक पेंडी २० रुपयाला विकत घ्यावी लागत आहे. सन २०१२ मध्ये ९ जुलैपर्यंत १७६ मि.मी. पाऊस कोसळला होता. मागच्या वर्षी अतिवृष्टीमुळे २० वर्षाचे रेकॉर्ड तुटून परिसरात ९ जुलैपर्यंत तब्बल ६५२ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आहे. सन २०१२ व सन २०१३ च्या तुलनेत यंदा परिसरात अत्यल्प पाऊस पडला आहे. यंदा ९ जुलैपर्यंत केवळ २९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. परिसरातील पाण्याचे सर्व स्रोत आटले आहे. जुलै महिन्यातही अनेक गावातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. संपूर्ण तालुक्यातच कोरडा दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली असून ग्रामीण भागातील अर्थकारण मात्र बिघडले आहे. आता तालुक्याची संपूर्ण भिस्त इसापूर धरणातून विसर्ग होणाऱ्या पाण्यावरच अवलंबून आहे. (प्रतिनिधी)