शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

प्रशासकीय इमारतीसाठी १ मेपर्यंतचा ‘अल्टीमेटम’

By admin | Updated: April 24, 2016 02:38 IST

शहर व तालुक्यातील जनतेच्या सोयीसाठी महत्त्वाची सर्व शासकीय कार्यालये एका ठिकाणी असावी, या हेतूने मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीला शासनाने यापूर्वीच हिरवी झेंडी दिली.

जनआंदोलनाचा इशारा : गृह राज्यमंत्र्यांना सर्वपक्षीय निवेदनपुसद : शहर व तालुक्यातील जनतेच्या सोयीसाठी महत्त्वाची सर्व शासकीय कार्यालये एका ठिकाणी असावी, या हेतूने मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीला शासनाने यापूर्वीच हिरवी झेंडी दिली. इमारतीसाठी जागेसह तब्बल पावणेआठ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. मात्र चार वर्षे उलटूनही प्रशासकीय इमारतीचे भिजत घोंगडे आहे. येत्या १ मेपर्यंत या बाबत कार्यवाही करावी, अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा सर्वपक्षीय नेते व सामाजिक संघटनांनी दिला. गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील शनिवारी येथे आले असता त्यांना सर्वपक्षीय निवेदन देण्यात आले. पुसद येथे जिल्हा पातळीवरची सर्व कार्यालये आहेत. मात्र ते शहरातील विविध वॉर्डात विखुरलेले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची गैरसोय होत आहे. नेमकी हीच बाब हेरून शासनाने पुसद येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीला सन २०१२ मध्ये मंजुरी दिली. त्यासाठी सात कोटी ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या इमारतीसाठी महसूल प्रशासनाने काकडदाती बायपासवरील अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील ३८ एकर ई क्लास जमीन उपलब्ध करून दिली. मात्र सदर जमिनीवर शंभरावर नागरिकांनी अतिक्रमण केल्याने प्रशासकीय इमारतीचे भिजत घोंगडे कायम आहे. महसूल प्रशासनाने या कामी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. परंतु कुठेतरी पाणी मुरत असल्याचा आरोप होत आहे. उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी अतिक्रमण हटवून सदर जागा सार्वजनिक बांधकाम विभागास हस्तांतरीत करणे गरजेचे आहे. तरच इमारतीचे बांधकाम सुरू होणार आहे. अतिक्रमित नागरिकांनाही पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. या बाबत १ मेपर्यंत कार्यवाही न झाल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी दिला. या प्रसंगी काँग्रेसचे अ‍ॅड.सचिन नाईक, जकी अन्वर, ज्ञानेश्वर तडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयवंतराव पाटील, धनंजय सोनी, शिवसेनेचे राजन मुखरे, अ‍ॅड.उमाकांत पापीनवार, भाजपाचे वसंतराव पाटील, भारत पाटील, निखिल चिद्दरवार, विनोद जिल्लेवार, नारायण मुडाणकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष अभय गडम, प्रशांत त्र्यंकटवार, पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद, अशोक बाबर, पुसद विकास मंचचे निशांत बयास, प्रा.नारायण क्षीरसागर, रवी जोशी, शेतकरी संघटनेचे नारायण पुलाते आदी उपस्थित होते. या प्रकरणी आमदार मनोहरराव नाईक यांनासुद्धा निवेदन दिल्याची माहिती आहे. आता कोणती कारवाई होते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)