शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पॉलिशच्या नावाखाली दोन महिलांना लुटले

By admin | Updated: August 24, 2016 00:51 IST

भांड्यांना घरच्याघरी पॉलिश करण्याचे आमिष देऊन दोन महिलांंना दोन भामट्यांनी २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना कळंब तालुक्यातील

कळंब : भांड्यांना घरच्याघरी पॉलिश करण्याचे आमिष देऊन दोन महिलांंना दोन भामट्यांनी २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना कळंब तालुक्यातील गलमगाव येथे मंगळवारी दुपारी घडली. याप्रकरणी कळंब पोलिसांनी अज्ञातांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. गलमगाव येथे सारिका प्रशांत तेलंग व वर्षा सुनील तेलंग या दोघी जावा घरकाम करीत होत्या. मंगळवारी दुपारच्या दरम्यान गावात काळ्या रंगाची दुचाकी घेऊन दोघे जण त्यांच्या घरी आले. तांबा व पितळीच्या भांड्यांना चकाकी आणून देतो, असे सांगत त्यांच्याशी ओळख निर्माण केली. त्यांनतर अचानकपणे बोलता-बोलता दोघींच्याही गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने पळवून नेण्यात आले. या दागिन्याची किंमत २५ हजार रुपये आहे. घरातच दिवसाढवळ्या झालेल्या चोरीमुळे भीतीचे वातावरण आहे. कळंब पोलिसांनी या चोरट्यांचा शोध जारी केला आहे. दागिणे चमकविण्याच्या नावाखाली जिल्ह्यात यापूर्वीही अनेक घटना घडल्या आहेत. दुपारच्या वेळी घरी पुरुष मंडळी नसताना हे भामटे महिलांंना गाठून आपले काम फत्ते करतात. भोळ्याभाबड्या महिला याला बळी पडतात.(तालुका प्रतिनिधी)