शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 22:28 IST

पांढरकवडा मार्गावरील साखरा येथे एसटी बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देएक बचावला : घाटंजी-पांढरकवडा मार्गावरील अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : पांढरकवडा मार्गावरील साखरा येथे एसटी बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली.संतोष अशोक टेकाम (२५) रा.मांगुर्डा, ता.केळापूर असे मृताचे नाव आहे. या अपघातात दुचाकी चालक प्रवीण पोतू टेकाम बचावला. पांढरकवडा ते नागपूर ही बस (क्र.एम.एच. ४०-वाय ५७८३) घाटंजीमार्गे नागपूरकडे जात होती. याचवेळी घाटंजीकडून प्रवीण आणि संतोष दुचाकीने (क्र.एमएच २९/टी ८५२०) घाटंजीकडून पांढरकवडाकडे जात होते. साखरा येथील वळणावर दुचाकी बसवर आदळली. यात संतोष जागीच ठार झाला.प्रवीण रोडच्या बाजूला पाण्याच्या डबक्यात फेकला गेल्यामुळे किरकोळ जखमी झाला. मात्र तो थोडक्यात बचावला. मागे बसलेला संतोष मात्र बसची जोरदार धडक बसल्याने जागीच ठार झाला. प्रवीण व संतोष रविवारी येळाबारा येथे नातेवाईकांकडे धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते.दरम्यान, माहिती देवूनही तब्बल दीड तासाने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यामुळे घटनास्थळी काही काळ तणाव पसरला होता. गावकऱ्यांनी मृतदेह उचलू देण्यास नकार दिला होता. पोलीस दाखल झाल्यानंतर गावकऱ्यांचा एका पोलीस कर्मचाºयाशी चांगलाच वाद झाला. गावकऱ्यांनी त्याला चोप दिल्याचे सांगितले जाते. या अपघातामुळे घाटंजी-पांढरकवडा मार्गावरील वाहतूक तीन तास खोळंबली होती. जखमी प्रवीणला घाटंजी ग्रामीण रुग्णालयात हलविले. पोलीस उपनिरीक्षक गणपत पुप्पूलवार यांनी गावकऱ्यांना शांत केले. दरम्यान तणावाची परिस्थिती बघता जादा कुमूक बोलाविण्यात आली होती. पारवा पोलिसांनी जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला असता नागरिक आक्रमक झाले होते. पीएसआय पुप्पूलवार यांनी हा वाद मिटविला.