लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आदिवासी समाजाचे विविध प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी एकमुखी मागणी गुरुवारी आदिवासी समाजबांधवांनी केली. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने यवतमाळात दुचाकी रॅली काढून तिरंगा चौकात जाहीर सभा घेण्यात आली. स्थानिक राणी दुर्गावती चौकातून दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.माजी मत्री शिवाजीराव मोघे यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. शहरातील विविध मार्गाने निघालेली दुचाकी रॅली तिरंगा चौकात विसर्जित झाली. रॅलीमध्ये पिवळे ध्वज आणि पिवळे फेटे परिधान केलेले समाजबांधव अनेकांचे लक्ष वेधून घेत होते. तिरंगा चौकात झालेल्या सभेनंतर जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले. जागतिक आदिवासी दिनाची शासकीय सुटी राज्य शासनाने जाहीर करावी, ६ जुलै २०१७ च्या बोगस आदिवासीसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची तत्काळ अमलबजावणी करावी, राज्यघटनेतील पाचवी व सहावी अनुसूची राज्यात तत्काळ लागू करावी, डीबीटीबद्दल योग्य निर्णय घेण्यात यावा, आदिवासी समाजाला स्वतंत्र धर्म कोड देण्यात यावा, आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृह समाजकल्याण विभागाच्या धर्तीवर स्वतंत्र बांधण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी राजू चांदेकर, किशोर उईके, शैलेश गाडेकर, निनाद सुरपाम, विवेक चौधरी, बंडू मेश्राम, कृष्णा पुसनाके, राजू केराम, नीलेश आत्राम, नरेश गेडाम, श्रीकांत किनाके, बालू वट्टी, अजय उईके, विनोद डवले, रेखा किनाके, मनिषा तिरणकर, मंदा मडावी, गिरीजा गेडाम, दिलीप उईके, राहुल कुमरे आदी उपस्थित होते.
जागतिक आदिवासी दिनी यवतमाळात दुचाकी रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 9:41 PM
आदिवासी समाजाचे विविध प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी एकमुखी मागणी गुरुवारी आदिवासी समाजबांधवांनी केली. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने यवतमाळात दुचाकी रॅली काढून तिरंगा चौकात जाहीर सभा घेण्यात आली. स्थानिक राणी दुर्गावती चौकातून दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : आदिवासींच्या प्रश्नांवर धोरणात्मक निर्णय घ्या