आर्णी : परस्पर विरुद्घ दिशेने येणारे दोन ट्रक एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात दोन्ही ट्रकचे चालक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास येथील माहूर मार्गावर घडली. अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही वाहनांच्या समोरील भागाचा चुराडा झाला. शेख सोहेल शेख सत्तार (३०) रा. भोकर, वाहक शेख इस्माईल शेख रऊफ असे जखमींचीे नावे आहेत. येथील प्रिया नर्सरीसमोर दोन्ही ट्रक पहाटे ५ वाजताच्या सुमारास एकमेकांवर आदळले. अपघात एवढा भीषण होता की एक ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन कोसळला व दुसऱ्या ट्रकचा चुराडा झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन जखमींना उपचारासाठी दाखल केले. अधिक तपास ठाणेदार संजय खंदाडे करीत आहे. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. (तालुका प्रतिनिधी)
आर्णीजवळ ट्रक अपघातात दोन गंभीर
By admin | Updated: January 4, 2017 00:12 IST