शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

एसबीआयचे दोन एटीएम दीड वर्षांपासून बंदच

By admin | Updated: September 7, 2016 01:42 IST

शहरातील भारतीय स्टेट बँकेचे दोन एटीएम गेल्या दीड वर्षांपासून बंद असल्याचे सांगितले जात आहे.

ग्राहक त्रस्त : मशीन बसविल्या पण सुरूच झाल्या नाही दारव्हा : शहरातील भारतीय स्टेट बँकेचे दोन एटीएम गेल्या दीड वर्षांपासून बंद असल्याचे सांगितले जात आहे. मुख्य बाजारपेठ आणि अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी असलेले एक एटीएम बंद असल्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.बँकेने ग्राहकांच्या सुविधेसाठी दोन ठिकाणी दुकाने भाड्याने घेवून त्यामध्ये मशीन बसविल्या. सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात आल्यानंतरही हे एटीएम सुरू होवू शकले नाही. परंतु दुकानाचे भाडे मात्र सुरू आहे. भारतीय स्टेट बँकेने तहसील कार्यालयासमोरील वाचनालयाच्या बाजूला आणि गोळीबार चौकातील खासगी दुकाने भाड्याने घेवून त्या ठिकाणी एटीएम मशीन बसविल्या. तहसील कार्यालयासमोर दिवसभर तालुक्यातील लोकांची मोठी गर्दी असते आणि गोळीबार चौकात तर शहरातील मुख्य बाजारपेठ आहे. त्यामुळे ही दोनही ठिकाणे अत्यंत वर्दळीची आहे.ही महत्त्वाची ठिकाणे पाहता इथे एटीएम असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ग्राहकांना चांगली सुविधा मिळू शकते आणि बँकेच्या व्यवहाराला चांगला प्रतिसादसुद्धा मिळू शकतो. परंतु एटीएम मशीन तर बसविण्यात आला पण सुरू मात्र झाल्या नाही. या संदर्भात बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता मशीन बंद असल्याचे मान्य करीत मशीनमध्ये कॅश टाकणाऱ्या कंपनीकडून कॅश टाकल्या जात नसल्याने एटीएम सुरू झाले नसल्याचे सांगण्यात आले आणि बँकेकडेही मनुष्यबळ नसल्याने कर्मचाऱ्यामार्फत ते काम केले जावू शकत नाही. त्यामुळे या दोनही ठिकाणचे एटीएम सुरूच न करण्याचा निर्णय बँकेनी घेतला आहे. असे असले तरी बँकेनी भाड्याने घेतलेल्या दोनही दुकानाचे भाडे सुरू आहे. त्यामुळे बँकेचे नुकसान झाले आणि ग्राहकांना सुविधाही मिळाली नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता जवळपास दीड वर्षानंतर हे एटीएम सुरूच न करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे ग्राहक चांगल्या सुविधेला मुकणार आहे. या दोन्ही ठिकाणी एटीएम अत्यंत आवश्यक असून ते बंद न करता सुरू करण्यात यावे, अशी मागणी केल्या जात आहे. (तालुका प्रतिनिधी)